Crime News Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: लसीकरणास मानला नसबंदी करण्याचा कट! पाकिस्तानात 2 पोलिस ठार

Pakistan Crime News: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मंगळवारी लसीकरण पथकासोबत गेलेल्या दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या केली.

दैनिक गोमन्तक

Pakistan: पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात अज्ञात बंदूकधाऱ्यांनी मंगळवारी लसीकरण पथकासोबत गेलेल्या दोन पोलिसांची गोळ्या झाडून हत्या केली. पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना दक्षिण वझिरीस्तानच्या सीमेला लागून असलेल्या टँक जिल्ह्यात घडली. हल्ल्यानंतर बंदूकधारी घटनास्थळावरुन पळून गेले. अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी संपूर्ण परिसराची नाकाबंदी केली आहे. गुन्हेगारांना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरु केली आहे. आतापर्यंत कोणत्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

दरम्यान, दहशतवादी (Terrorist) पोलिओ लसीकरणाला विरोध करतात. खैबर पख्तुनख्वाचे मुख्यमंत्री मेहमूद खान यांनी प्रांतीय पोलिसांना (Police) दोषींना लवकरात लवकर अटक करण्याचे निर्देश दिले आहेत.

पोलिओ टीमवर हल्ल्याच्या आणखी दोन घटना

पोलिओ पथकावरील हल्ले हे भ्याड कृत्य असल्याचे मेहमूद यांनी म्हटले आहे. या कर्मचाऱ्यांवर हल्ला करणारे लोक आमच्या मुलांचे शत्रू आहेत. मेहमूद यांनी पोलिओ पथकाचे रक्षण करणाऱ्या दोन पोलिसांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला. या हल्ल्यात सहभागी असलेल्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही ते म्हणाले. 2022 मध्ये पाकिस्तानमध्ये पोलिओ पथकावर हल्ल्याच्या आणखी दोन घटना घडल्या आहेत. 28 जून रोजी, अज्ञात हल्लेखोरांनी उत्तर वझिरीस्तानातील आदिवासी भागात पोलिओ पथकासोबत गेलेल्या दोन पोलिसांसह तीन जणांची हत्या केली. मार्चमध्ये, उत्तर-पश्चिम पाकिस्तानमध्ये लसीकरण मोहिमेत भाग घेऊन घरी परतणाऱ्या महिला कर्मचार्‍यांवर बंदूकधाऱ्यांनी गोळ्या झाडल्या होत्या.

रस्ते अपघातात 28 जणांचा मृत्यू झाला

त्याच वेळी, मंगळवारी पाकिस्तानच्या (Pakistan) पंजाब आणि सिंध प्रांतात दोन वेगवेगळ्या रस्ते अपघातात 28 लोक ठार आणि 26 जण जखमी झाले. तर पंजाब प्रांतातील मुलतान-सुक्कूर महामार्गावर (M-5) प्रवासी बस आणि तेल टँकर यांच्यात झालेल्या अपघातात 20 लोक ठार आणि सहा जण जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT