Johannesburg Shooting
Johannesburg Shooting 
ग्लोबल

Johannesburg Shooting: जोहान्सबर्गमध्ये अंदाधुंद गोळीबार, बारमध्ये 14 ठार, 10 जखमी

दैनिक गोमन्तक

Johannesburg Shooting: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथील बारमध्ये बॉम्बर्सनी अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी सांगितले की, जोहान्सबर्गच्या सोवेटो टाऊनशिपमधील एका बारमध्ये गोळीबार झाला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. ही घटना शनिवारी रात्री घडली.

हल्लेखोर मध्यरात्रीनंतर सोवेटो, जोहान्सबर्ग येथील एका बारमध्ये घुसले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर हल्लेखोर पांढऱ्या रंगाच्या टोयोटा क्वांटम मिनीबसमधून पळून गेले. या हल्ल्यात 10 जण जखमी झाल्याची माहिती आहे, तर तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारमध्ये लोक नाचत असताना हल्लेखोर आले आणि त्यांनी गोळीबार सुरू केला. अचानक घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली. यामध्ये 12 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 2 जणांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अशाप्रकारे एकूण 14 जणांचा मृत्यू झाला आहे.

मृत्यू झालेल्यांचे वय 19 ते 35 वर्षे दरम्यान आहे

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मृत्युमुखी पडलेल्यांपैकी बहुतांश लोक 19 ते 35 वयोगटातील आहेत. ऑर्लॅंडो पोलिस स्टेशनचे कमांडर ब्रिगेडियर नॉनहल्लानहला कुबेका यांनी सांगितले की, या प्रसंगाची सविस्तर माहिती लवकरच दिली जाईल. घटनास्थळावरून जप्त करण्यात आलेल्या काडतुसांवरून हल्लेखोरांची संख्या एकापेक्षा जास्त असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र, हल्लेखोरांनी ही घटना का घडवली हे अद्याप समजू शकलेले नाही.

याआधीही नाईट क्लबमध्ये 22 जणांचा बळी गेला

यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेच्या दक्षिणेकडील पूर्व लंडन शहरातील नाईट क्लबमध्ये किमान 22 लोक ठार झाले होते . रविवारी त्याच दिवशी सीनरी पार्कमधील एनोबेनी टॅव्हर्नमध्येही ही घटना घडली. मृतांमध्ये 18-20 वयोगटातील तरुणांचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

Goa Election 2024 Voting Live: मुख्यमंत्री दक्षिणेत; कामतांसोबत दिल्या मतदान केंद्रांना भेट

Goa Congress: पल्लवी धेंपे, सिद्धेश नाईक मंत्री ढवळीकर यांच्याविरोधात काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार

Israel Hamas War: रफाह शहराच्या सीमेजवळ इस्त्रायलची मोठी तयारी; ‘हा’ मुस्लिम मित्र देश संतापला; नेतन्याहू यांना दिला इशारा

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

SCROLL FOR NEXT