Hindu Temple  Dainik Gomantak
ग्लोबल

Bangladesh: बांगलादेशात एकाच वेळी 14 हिंदू मंदिरांवर हल्ला, धार्मिक स्थळांना...

Hindu Temples Vandalized: बांगलादेशात अनेक महिन्यांपासून हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

Manish Jadhav

Bangladeshi Hindu Temple vandalized in Bangladesh: बांगलादेशातील हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांवर होणारे हल्ले थांबण्याचे नाव घेत नाहीत. अज्ञात हल्लेखोरांनी शनिवारी रात्री वायव्य बांगलादेशातील 14 हिंदू मंदिरांची तोडफोड केली.

हिंदू समुदायाचे नेते विद्यानाथ बर्मन यांनी सांगितले की, अज्ञात लोकांनी रात्री हल्ले केले आणि 14 मंदिरांच्या मूर्तींची तोडफोड केली. बांगलादेशात अनेक महिन्यांपासून हिंदू आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना सातत्याने लक्ष्य केले जात आहे.

मूर्ती तोडून तलावात फेकल्या

बर्मन यांनी सांगितले की, काही मूर्ती मंदिरातच (Temple) नष्ट झाल्या आहेत, तर काही मंदिराच्या ठिकाणांजवळील तलावात सापडल्या आहेत. ते पुढे म्हणाले की, गुन्हेगारांची अद्याप ओळख पटलेली नाही, परंतु त्यांना लवकरात लवकर पकडले जावे अशी आमची इच्छा आहे. कारण "आधी इथे अशा घृणास्पद घटना घडल्या नव्हत्या."

लक्ष्यित हल्ल्याबाबत सरकार गंभीर नाही

यापूर्वीही हिंदूंच्या धार्मिक स्थळांना लक्ष्य करण्यात आले आहे. यासोबतच हिंदूंवरही हल्ले होत आहेत. समर चॅटर्जी यांनी सांगितले की, या हल्ल्यामागे कोणाचा हात असू शकतो हे अद्याप समजू शकलेले नाही.” बालियाडांगी पोलिस (Police) स्टेशनचे प्रभारी अधिकारी खैरुल अनम यांनी सांगितले की, शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे अनेक गावांमध्ये हल्ले झाले.

ठाकूरगावचे पोलिस प्रमुख जहांगीर हुसेन यांनी पत्रकारांना सांगितले की, "देशातील शांतता बिघडवण्यासाठी हा नियोजित हल्ला असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे." ते पुढे म्हणाले की, पोलिसांनी तात्काळ दोषींचा शोध घेण्यासाठी तपास सुरु केला आहे.

ठाकूरगावचे प्रशासकीय प्रमुख महबूबुर रहमान म्हणाले की, “हे प्रकरण शांतता आणि सांप्रदायिक सलोख्याविरुद्ध कट असल्याचे दिसते आणि… हा गंभीर गुन्हा आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT