Ansarul Islam Terrorists Organization Bangladesh: आसाम पोलिसांनी बांगलादेशातील अन्सारुल इस्लाम या दहशतवादी संघटनेशी संबंधित 12 जिहादींना अटक केली आहे. एक दिवसापूर्वी आसाम पोलिसांनी स्लीपर सेलचा भंडाफोड केला होता. ते बांगलादेशी दहशतवाद्यांना आपल्या घरात आश्रय देत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी अनेक ठिकाणी दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहेत. ऑपरेशन अजूनही सुरु आहे.
दरम्यान, अन्सारुल इस्लाम या दहशतवादी संघटनेची मुळे अनेक देशांमध्ये पसरलेली आहेत. पाकिस्तान आणि बांगलादेशच्या सीमेवरुन भारतात घुसून दहशतवादी भारतातील विविध राज्यांमध्ये पोहोचतात, असे अलीकडेच अहवालात म्हटले आहे. दहशतवादी संघटनांनी अनेकवेळा असे प्रयत्न केले आहेत, मात्र यंत्रणांच्या सतर्कतेमुळे त्यांचे हेतू सफल होत नाहीत.
दुसरीकडे, आसाममधील अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस आणि सुरक्षा दले सक्रिय आहेत. गुप्तचर यंत्रणांकडून माहिती मिळाल्यानंतर तात्काळ कारवाई केली जाते. आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत म्हणजे 2021 मध्ये बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तानमध्ये (Pakistan) सर्वाधिक घुसखोरी झाली आहे. मोठ्या प्रमाणात घुसखोरही पकडले आहेत.
शिवाय, आसाम पोलिसांनी (Police) मोरीगावमध्ये एका दहशतवादी (Terrorist) मॉड्यूलचाही पर्दाफाश केला आहे. येथील एका मदरशात जिहादी कारवाया केल्या जात असल्याचे सांगण्यात आले होते. येथून एका संशयित जिहादीला अटक करण्यात आली असून, 'मुफ्ती मुस्तफा' असे त्याचे नाव आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.