11,000 MT Rice from India Reaches Colombo Ahead of New Year Celebration in Sri Lanka Dainik Gomantak
ग्लोबल

भारतातून श्रीलंकेत पोहचला 11,000 मेट्रिक टन तांदूळ

2 राष्ट्रांचे विशेष संबंध चिन्हांकित करणारा हा पुरवठा सुरूच राहील

दैनिक गोमन्तक

श्रीलंकेतील (Sri Lanka) नवीन वर्षाच्या उत्सवापूर्वी आज मंगळवारी भारतातून 11,000 मेट्रिक टन तांदळाचा साठा चेन ग्लोरी या जहाजातून कोलंबोला पोहोचला. मागील आठवड्यातच भारताकडून श्रीलंकेला एकूण 16,000 मेट्रिक टन तांदूळ पुरवठा करण्यात आला आहे. “2 राष्ट्रांचे विशेष संबंध चिन्हांकित करणारा हा पुरवठा सुरूच राहील, असे श्रीलंकेतील भारतीय दूतावासाने सांगितले.

दरम्यान एक किलो दूध पावडर 1900 रुपयांना विकली जात आहे. श्रीलंकेत महागाई एवढी वाढली आहे की तांदूळ 220 रुपये किलो आणि गहू 190 रुपये किलो दराने विकला जात आहे. त्याचबरोबर एक किलो साखरेचा भाव 240 रुपये, खोबरेल तेल 850 रुपये लिटर, तर एका अंड्याचा किरकोळ दर 30 रुपये आणि 1 किलो दूध पावडरचा भाव 1900 रुपयांवर पोहोचला आहे.

भारताने अलीकडेच श्रीलंकेला एक अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले आहे. वृत्तानुसार, श्रीलंकेने भारताकडून आणखी दीड अब्ज डॉलर्सची मागणी केली आहे. रॉयटर्सच्या अहवालात असे म्हटले आहे की जानेवारी 2022 पासून, भारताने क्रेडिट लाइनद्वारे 214 अब्जांची मदत केली आहे. गरज भासल्यास भारत श्रीलंकेला अधिक मदत करून कोलंबोमध्ये अधिक स्थान मिळवू शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Culture: कोकणातली अनोखी परंपरा! नागपंचमीला लहानथोर रंगतात 'भल्ली भल्ली भावय'च्या खेळात, रंगतो वाघ-नागाचा खेळ

कोल्हापूर-गोवा मार्ग तिसऱ्यांदा वाहतुकीस बंद, पावसामुळे खोळंबा; प्रवाशांची मोठी गैरसोय!

Goa Waterfall Ban: दक्षिण गोव्यात 'नो एंट्री' झोन! नद्या, धबधबे आणि खाणींमध्ये पोहण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश जारी

SBI Manager कामासाठी गोव्यात आली अन् मुंबईच्या घरातून चोरी झाली लाखोंची थार

Ganesh Idol: '..फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार'! पार्सेतील कुटुंब रंगलंय चित्रशाळेत; श्री गणरायाच्या आगमनाची लगबग

SCROLL FOR NEXT