Ganesh Chaturthi in Bicholim Dainik Gomantak
ganesh chaturthi festival

Ganesh Chaturthi : डिचोलीत शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराची खास प्रतिकृती

तब्बल पंधरा दिवस मेहनत घेऊन डिचोलीतील एक प्रसिद्ध चित्रकार मिलिंद तेली यांनी साथी कारगिरांच्या मदतीने हा देखावा साकारला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ganesh Chaturthi : बेचाळीस वर्षांचा इतिहास असलेल्या डिचोली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यंदा पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रवेशद्वाराची हुबेहूब प्रतिकृती उभारण्यात आली आहे. हा भव्य देखावा यंदा गणेशभक्तांचे नक्कीच आकर्षण ठरणार असल्याचा विश्वास गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना आहे. हा देखावा 51 फूट रुंद आणि 18 फूट उंच आहे.

गणेशोत्सव मंडळ पदाधिकाऱ्यांच्या नगराध्यक्ष कुंदन फळारी यांच्या हस्ते रविवारी (ता.28) या देखाव्याचे अनावरण करण्यात आले. दरवर्षी वेगवेगळे आणि आकर्षक देखावे उभारण्यावर डिचोली गणेशोत्सव मंडळाचा भर असतो. यंदा शनिवारवाड्याची संकल्पना समोर ठेवून देखावा उभारण्यात आला आहे.

तब्बल पंधरा दिवस मेहनत घेऊन डिचोलीतील एक प्रसिद्ध चित्रकार मिलिंद तेली यांनी साथी कारगिरांच्या मदतीने हा देखावा साकारला आहे. गणेशोत्सव मंडळाच्या सदस्यांनीही याकामी हातभार लावला आहे. हा देखावा उभारण्यासाठी जवळपास २ लाख रुपये खर्च आला आहे.

पर्यावरणपूरक देखावा

प्लायवूड, लोखंड यापासून हा देखावा उभारण्यात आला असून, यंदाचा हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे. अशी माहिती चित्रकार मिलिंद तेली यांनी देऊन हा देखावा गणेशभक्तांना निश्चितच आकर्षित करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT