Hindu Girl: कर्नाटकातील मंड्या पोलिसांनी युनूस पाशा नावाच्या मुस्लिम तरुणाला अटक केली आहे. या तरुणावर एका हिंदू अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन लग्नासाठी धर्मांतराची अट घातल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मांड्या जिल्ह्यातील नागमंगला भागातील आहे.
आरोपी आणि पीडिता शेजारी आहेत
आरोपी युनूस पाशा अल्पवयीन पीडितेच्या घराशेजारी राहतो. युनूस विवाहित असून तो एका मुलाचा बापही आहे. युनूसने पीडितेशी जवळीक साधली आणि तिला मोबाईल भेट दिल्याचा आरोप आहे. फोन आल्यानंतर फोनवरील संभाषणाबरोबरच व्हिडिओ कॉलचाही क्रम सुरु झाला. दोघांचे नाते आता ओळखीच्या पलीकडे गेले होते. युनूसने प्रेमामध्ये पीडितेचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ रेकॉर्ड केले. यानंतर युनूसने पीडितेला ब्लॅकमेल करुन शारीरिक संबंध ठेवण्यासाठी पीडितेवर दबाव टाकला. मात्र यासाठी पीडिता तयार नव्हती.
याप्रकरणी, पीडितेच्या वडिलांनी 19 नोव्हेंबर रोजी पोलिसात (Police) तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले की, '12 नोव्हेंबर रोजी तो तिरुपतीहून परतला तेव्हा त्याला पीडितेच्या वागण्यात बदल जाणवला. पीडित तरुणी खूप तणावाखाली होती. दरम्यान, पीडितेने युनूसला फोन करुन लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली, त्यावर युनूसने हिंदू धर्म सोडून इस्लाम स्वीकारण्याची अट घातली.'
दुसरीकडे मात्र, युनुसची ही अट ऐकताच पीडितेच्या पायाखालची जमीनच सरकली. 18 नोव्हेंबर रोजी पीडितेने तिच्या कुटुंबीयांना आपल्या बाबतीत घडलेल्या धक्कादायक प्रकाराची सगळी माहिती सांगितली, त्यानंतर मंड्या पोलीस ठाण्यात युनूस पाशाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तातडीने कारवाई करत पोलिसांनी आरोपी युनूसला अटक केली. 13 वर्षीय पीडित मुलगी (Girl) देखील अपंग असल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. पोलीस वैद्यकीय तपासणीतून याची पुष्टी करत आहेत. नोंदवलेल्या गुन्ह्यातील सर्व आरोपांचाही पोलीस तपास करत आहेत.
पीडित मुलीच्या वडिलांनी आपल्या तक्रारीत म्हटले की, 'माझी 13 वर्षांची मुलगी जी आठवीत शिकत होती, एकेदिवशी ती घरी एकटीच परतत असताना तिला घरासमोर राहणाऱ्या एका व्यक्तीने पहिल्यांदा ब्लॅकमेल केले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला आणि लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याची अट घातली. या तक्रारीवरुन आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तक्रारीच्या सर्व पैलूंचा तपास सुरु आहे.'
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.