Shivaraj S Tangadagi Dainik Gomantak
देश

PM Modi: 'मोदी-मोदी' नारा देणाऱ्या तरुणांना थप्पड मारायला पाहिजे, कर्नाटकच्या मंत्र्याचे आक्षेपार्ह वक्तव्य

Shivaraj S Tangadagi म्हणाले, त्यांना विकासकामे करण्यात अपयश आले आहे. दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी कोणाला काम दिले आहे का?

Ashutosh Masgaunde

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान कर्नाटकातील कोप्पलमध्ये कर्नाटकचे मंत्री शिवराज एस तंगडगी यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली,

एका जाहीर सभेत बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी दोन कोटी नोकऱ्यांचे आश्वासन दिले होते. त्यांनी नोकऱ्या दिल्या का? त्यांना लाज वाटायला पाहिजे. '

पुढे त्यांनी पंतप्रधान मोदींच्या समर्थकांवरही निशाना साधला व म्हणाले, 'मोदी-मोदी'चा नारा देणाऱ्या त्यांच्या तरुण समर्थकांना थप्पड मारायला हवी.

कोप्पल जिल्ह्यातील करातगी येथे कार्यकर्त्यांसमोर बोलताना शिवराज एस तंगडगी म्हणाले की, गेल्या 10 वर्षांपासून सर्व काही खोट्याच्या आधारे चालवले जात आहे. त्यामुळे आणखी पाच वर्षे ते फसवू शकतात असे त्यांना वाटते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतात १०० स्मार्ट शहरांचे आश्वासन दिले होते. कुठे आहेत स्मार्ट शहरे? एखाद्या स्मार्ट शहराचे नाव सांगा. ते हुशार आहेत, चांगले कपडे घालतात, ते स्मार्ट भाषणे देतात. आपला पोशाख बदलत राहतात. तसेच त्यांचे एकापेक्षा एक स्टंट समोर येतात, जसे की समुद्राच्या खोलात जात पूजा करणे, असे काम पंतप्रधानांनी करावे का? अस सवालही शिवराज एस तंगडगी यांनी यावेळी केला.

भाजप विकास करण्याच्या आघाडीवरही अपयशी ठरला आहे. अशा स्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीत मते मागताना भाजपला लाज वाटली पाहिजे. ते कोणत्या तोंडाने मते मागायला येत आहेत, असे शिवराज एस तंगडगी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, त्यांना विकासकामे करण्यात अपयश आले आहे. दोन कोटी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांनी कोणाला काम दिले आहे का? त्यांना जाब विचारला असता ते म्हणतात 'पकोडे' विका. त्यांना लाज वाटायला हवी.

दरम्यान कर्नाटकच्या मंत्र्यांच्या या वादग्रस्त विधानावर भाजपनेही जोरदार पलटवार केला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि पक्षाचे माजी राष्ट्रीय सरचिटणीस सीटी रवी यांनी याला उत्तर दिले आहे.

काँग्रेसवर निशाणा साधत ते म्हणाले, आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव होणार आहे. याची जाणीव काँग्रेसजनांना होत आहे. यासाठी ते रोज नवीन खालची पातळी गाठत आहेत आणि पंतप्रधान मोदींना हुकूमशहा म्हणत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: खून प्रकरणातील आरोपी, कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या सहकाऱ्याला गोवा पोलिसांनी कशी अटक केली?

US Mass Shooting: अमेरिकेत कॅथलिक शाळेवर गोळीबार; लहान मुले, शिक्षक अडकले, शूटरला अटक

Asia Cup 2025: यूएईमध्ये भारताची कामगिरी कशी? पाकिस्तानविरुद्ध लाजिरवाणा रेकॉर्ड, तरीही टीम इंडिया विजेतेपदाची दावेदार

Viral Video: डॉगेश भाई से पंगा नहीं… ! जंगलाच्या राणीला दिली जबरदस्त टक्कर; सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल

Iran: इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सची मोठी कारवाई! 5 पोलिसांच्या हत्येचा बदला घेत 13 दहशतवाद्यांचा केला खात्मा VIDEO

SCROLL FOR NEXT