Youth denies to attend fixed marriage as he received 50 lakh dowry offer from other's Gorakhpur UP  Dainik Gomantak
देश

Gorakhpur: 50 लाख हुंड्याची ऑफर आली म्हणून ठरलेले लग्न मोडले; मुलासह पालक, नातेवाईकांवर गुन्हा

मुलाने अचानक घेतलेल्या या निर्णायामुळे मुलीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.

गोमन्तक डिजिटल टीम

Gorakhpur: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू असून, गोरखपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दुसऱ्या ठिकाणी 50 लाख हुंड्याची ऑफर आली म्हणून मुलाने चक्क ठरलेले लग्न मोडले. 10 मे रोजी हे लग्न होणार होते.

मुलीच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. सगळे नातेवाईक जमले होते. दरम्यान, मुलाने अचानक घेतलेल्या या निर्णायामुळे मुलीच्या कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना गोरखनाथ परिसरातील आहे. यानंतर पीडितेच्या वडिलांनी पोलिसांकडे मदतीचे आवाहन केले आहे. वास्तविक, गोरखनाथ परिसरातील विकास नगर, बारगडवा येथील एका मुलीचे लग्न चिलुआताल भागातील राप्तीनगर येथील अरुण उपाध्याय यांचा मुलगा प्रशांत उपाध्याय याच्यासोबत निश्चित झाले होते.

साखरपुडाही मोठ्या थाटामाटात पार पडला. त्यानंतर 10 मे रोजी लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. मात्र शेवटच्या क्षणी मुलांनी लग्नास नकार दिला. यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केली.

हुंडा घेऊन मुलाने लग्न मोडले.

मुलीच्या वडिलांच्या तक्रारीनुसार, मुलाकडच्यांनी हुंड्याची रक्कम घेतली आणि गाडीची रक्कमही घेतली. पण, दुसरीकडून 50 लाख हुंड्याची ऑफर आल्याने त्यांनी तिथे लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मुलगा, पालक आणि नातेवाईकांवर गुन्हा दाखल

पीडितेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण प्रशांत उपाध्याय, त्याचे वडील अरुण उपाध्याय आणि आई नलिनी उपाध्याय यांच्याविरुद्ध चिलुआतल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी चिलुआतल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून, पोलिस पुढील कारवाई करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT