Wrestlers Protest Dainik Gomantak
देश

Wrestlers Protest : कुस्तीपटूंनी कोणतेही द्वेषयुक्त भाषण केले नाही; पोलिसांचा कोर्टात खुलासा

Police on Wrestlers: आपल्या अहवालात पोलिसांनी म्हटले आहे की, जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनादरम्यान कुस्तीपटूंविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचे कोणतेही प्रकरण नाही.

Ashutosh Masgaunde

 Wrestlers Against Brijbhushan Saran Singh

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलक कुस्तीपटूंविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचा कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दिली.

कुस्तीपटू विनेश फोगट, बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक यांच्या विरोधात 'अटल जन पार्टी'चे राष्ट्रीय प्रमुख असल्याचा दावा करणाऱ्या बम बम महाराज नौहटिया यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती.

पोलिसांनी पतियाळा हाऊस कोर्टात स्टेटस रिपोर्ट दाखल केला असून कोर्टाने अहवाल रेकॉर्डवर घेतला आहे. आपल्या अहवालात पोलिसांनी म्हटले आहे की, जंतरमंतर येथे झालेल्या निदर्शनादरम्यान कुस्तीपटूंविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्याचे कोणतेही प्रकरण नाही.  

"तक्रारदाराने या बातमीची आणि निषेधाची व्हिडिओ क्लिप असलेली एक पेन ड्राइव्ह देखील दिली आहे ज्यामध्ये काही अज्ञात शीख आंदोलक 'मोदी तेरी कबर खुदेगी, आज नही तो कल खुदेगी' अशा घोषणा देत व्हिडिओ क्लिपमध्ये दिसत आहेत," असे पोलिसांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, "या संदर्भात असे सादर केले आहे की तक्रारदाराने पेन ड्राईव्हमध्ये दिलेल्या व्हिडिओ क्लिपचे अवलोकन केल्यावर असे समोर आले आहे की व्हिडिओ क्लिपमध्ये काही अज्ञात शीख आंदोलक दिसत आहेत जे जंतरमंतरवर घोषणा देत आहेत की 'मोदी तेरी कबर खुदेगी. तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीतील मजकूर आणि व्हिडिओ क्लिपमधून द्वेषयुक्त भाषणाचा कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नाही.

"आंदोलक पैलवान बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर कुस्तीगीर या क्लिपमध्ये अशी कोणतीही घोषणाबाजी करताना दिसत नाहीत. त्यामुळे या न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे की, तक्रारदाराने दाखल केलेली तक्रार फेटाळण्यात यावी.

पटियाला हाऊस कोर्टाने या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ जुलै रोजी युक्तिवादासाठी निश्चित केली आहे.

याशिवाय पोलिसांनी सांगितले की, बम बम महाराज यांनी दाखल केलेल्या इतर दोन तक्रारींबाबत (ज्यात त्यांनी ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर ठोस पुराव्याशिवाय खोटे आरोप केल्याचे म्हटले आहे) त्या तक्रारी कॅनॉट प्लेस पोलिस स्टेशनला पाठवण्यात आल्या, जिथे कुस्तीपटूंनी दोन एफआयआर दाखल केले आहेत.

एसआयटीकडून तपासाला गती

भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध लैंगिक शोषणाच्या आरोपांबाबत दिल्ली पोलिसांच्या एसआयटीने तपास वेगवान केला आहे. पुढील आठवड्यापर्यंत एसआयटी आपला तपास अहवाल न्यायालयात सादर करण्याच्या तयारीत आहे.

एसआयटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे 208 लोकांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तपास पथकाने ब्रिजभूषण यांच्या दिल्लीतील निवासस्थानी तसेच गोंडा येथील त्यांच्या घरी चौकशी केली.

एसआयटीने ब्रिजभूषण यांचे माजी सहकारी, नातेवाईक आणि सहकाऱ्यांच्या नातेवाईकांचे जबाबही नोंदवले असून त्यांना ब्रिजभूषण यांच्यासोबतच्या वागणुकीबाबत विचारणा केली आहे. बृजभूषण आपल्या जवळच्या लोकांशी कसे वागायचे, याचाही शोध घेण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT