जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक थानू पद्मनाभन (Physics Professor Thanu Padmanabhan) यांचे शुक्रवारी निधन झाले. Dainik Gomantak
देश

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक थानू पद्मनाभन यांचे निधन

सामान्य सापेक्षता (general relativity) आणि थर्मोडायनामिक्सला नवीन मार्गांनी आणि इतर क्षेत्रांमध्ये जोडणारे त्यांचे संशोधन मोठ्या प्रमाणावर ओळखले गेले आहे. पद्मनाभन यांच्या पश्चात पत्नी डॉ. वासंती पद्मनाभन आणि मुलगी हम्सा आहेत.

दैनिक गोमन्तक

जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्राध्यापक थानू पद्मनाभन (Physics Professor Thanu Padmanabhan) यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने त्यांना तातडीने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारा दरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

10 मार्च 1957 रोजी तिरुअनंतपुरम येथे जन्मलेल्या प्राध्यापक थानू पद्मनाभन यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले होते. पद्मनाभन यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. आपल्या लेखांद्वारे विज्ञानाला लोकप्रिय करण्यात त्यांचा सक्रिय सहभाग घेतला होता.

पुण्याच्या इंटर युनिव्हर्सिटी सेंटर फॉर एस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स आणि कॉस्मॉलॉजिस्ट येथे पद्मनाभन हे प्राध्यापक होते. त्यांची गेल्या महिन्यात ‘केरळ शास्त्र पुरस्करम’ 2021 साठी निवड झाली होती. केरळ सरकारने राज्यातील वैज्ञानिकांना सन्मानित करण्यासाठी हा पुरस्कार संस्थात्मक केला आहे.

वयाच्या 20 वर्षी त्यांनी बीएससी विद्यार्थी म्हणून जनरल रिलेटिव्हिटीवर पहिला शोधनिबंध प्रकाशित केला. त्यांनी केरळच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून B.Sc (1977) आणि M.Sc (1979) पूर्ण केले. क्वांटम सिद्धांत, गुरुत्वाकर्षण, ब्रह्मांडशास्त्र आणि विश्वातील संरचना निर्मिती ही त्यांची आवडती क्षेत्रे होती.

"सामान्य सापेक्षता (general relativity) आणि थर्मोडायनामिक्सला (thermodynamics) नवीन मार्गांनी आणि इतर क्षेत्रांमध्ये जोडणारे त्यांचे संशोधन मोठ्या प्रमाणावर ओळखले गेले आहे. थानू पद्मनाभन हे विद्वान, संप्रेषक, विलक्षण शास्त्रज्ञ, एक चांगले मित्र अशी त्यांची ख्याती होती. अशी प्रतिक्रिया भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार के विजय राघवन (K Vijay Raghavan, Chief Scientific Adviser, Government of India), यांनी व्यक्त केली आहे. पद्मनाभन यांच्या पश्चात पत्नी डॉ. वासंती पद्मनाभन आणि मुलगी हम्सा आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT