World AIDS Day 2022 Dainik Gomantak
देश

World AIDS Day 2022: HIV अन् एड्सबाबत तुम्हाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे वाचा एका क्लिकवर

दरवर्षी 1 डिंसेबर हा दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो.

दैनिक गोमन्तक

देशात दरवर्षी 1 डियेंबर हा दिवस जागतिक एड्स दिवस म्हणून साजरा केला जातो. HIV विषाणू आणि एड्ससंदर्भात वेगवेगळे समज आणि गैरसमज लोकांच्या मनात आहे. ते आज अपण या दिनानिमित्त दुर करणार आहोत.

हा आजार 1980 च्या दशकात पसरायला सुरुवात झाली. HIVची लागण कशी होते, या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींबरोबर राहिल्याने काही धोका असतो का, या सगळ्या प्रश्नांवर अनेक माध्यमांद्वारे जनजागृती पसरत असली तरीसुद्धा आजही अनेक गैरसमजुतीं बाळगल्या जातात.

  • एचआयव्ही एड्स गंभीर आजार का समजला जातो?

एचआयव्हीची लागण झाल्यास सुरूवातीच्या काळात लक्षणे दिसत नसल्यामुळे सुरुवातीची काही वर्षं एचआयव्हीकडे दुर्लक्ष होतं. परिणामी लवकर निदान, उपचार आणि व्यवस्थापन करणं कठिण होते. त्यामुळेच एचआयव्ही/एड्सला सायलेंट किलरही म्हटले जाते.

एड्सला सामाजिक दृष्ट्या वाईट समजले जाते. याचा संसर्ग असलेल्या व्यक्तींबरोबर भेदभावही केला जातो. त्यामुळे याला आळा घालण्याबरोबर काळजी घेणे किंवा सहकार्य करण्याचे प्रयत्नही कठिण ठरतात. तसेच एचआयव्ही हा प्रामुख्याने लैंगिक संबंधांतून पसरतो. यामुळे चर्चा करणे देखील अत्यंत कठिण असते.

  • इंजेक्शनद्वारे एचआयव्हीचा धोका निर्माण होउ असू शकतो?

शरिरात कोणतेही इंजेक्शन टोचल्यानंतर रक्त येतच असते. म्हणजेच सुई आणि सिरींजचा रक्ताशी संपर्क येतो. एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीच्या शरिरातील रक्तात त्याचे विषाणू मोठ्या प्रमाणावर असतात. अशा संक्रमित व्यक्तीसाठी वापरलेले इंजेक्शन जर पुन्हा वापरले, तर या संसंर्ग होण्याचा धोका असतो. तसंच इतर वैद्यकीय उपकरणं निर्जंतुकीकरण केल्याशिवाय वापल्यानंही एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका संभवतो.

  • टॅटू काढल्यामुळे HIVची लागण होऊ शकते का?

रक्ताच्या संपर्कात आलेली उपकरणे योग्य पद्धतीने निर्जंतुक केली नाहीत किंवा तशीच इतर लोकांसाठी वापरली तर एचआयव्हीच्या प्रसाराचा धोका असतो. त्यामुळे जी उपकरणे शरिर किंवा त्वचेच्या आत प्रवेश करत असतात त्यांचा एकदाच वापर करायला हवा किंवा पुन्हा वापरापूर्वी त्यांचं व्यवस्थित निर्जंतुकीकरण करावं. टॅटू काढतांना एचआयव्हीचा किंवा रक्तापासून होणारे इतर संसर्ग याचा प्रसार कसा होत असतो आणि ते रोखण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी याचं प्रशिक्षण द्यायला हवं.

  • लैंगिक संबंधांद्वारे एचआयव्हीची लागण होणे कसे टाळू शकतो?

लैंगिक संबंधांपासून दूर राहून किंवा परस्पर विश्वासातून लागण नसलेल्या एकाच पार्टनरबरोबर लैंगिक संबंध ठेवून हे टाळता येते. त्याशिवाय सुरक्षित लैगिंक संबंधाच्या सवयीद्वारेही टाळता येणे शक्य असते. सुरक्षित लैंगिक संबंध म्हणजे, कंडोमचा योग्य आणि नियमित वापर करणे होय.

  • आईकडून गर्भातील बाळाला एचआयव्हीचा संसर्ग कसा होऊ शकतो?

एचआयव्हीग्रस्त गर्भवती महिलेच्या रक्ताद्वारे गर्भातील बाळाला संसर्ग होऊ शकतो. गर्भवती महिलेला जर एचआयव्हीची लागण झालेली असेल किंवा एड्सची अॅडव्हान्स स्टेज असेल तर बाळाला अधिक धोका असू शकतो.

जन्माच्या वेळी बाळ आईच्या जननेंद्रियातून जात असते, तेव्हाही संसर्गाचा धोका असतो. तसेच आई बाळाला स्तनपान करतानाही संसर्ग होऊ शकतो.

  • स्तनपानातून एचआयव्हीचा संसर्ग होऊ शकतो का?

आईच्या दुधात हा विषाणू आढळला आहे, पण त्याचे प्रमाण कमी आहे. काही अभ्यासांतून समोर आलेल्या माहितीनुसार एचआयव्हीग्रस्त महिलेच्या पोटी जन्मलेल्या 10 ते 15% बाळांना स्तनपानाद्वारे एचआयव्हीची लागण होऊ शकते.

पण आईच्या दुधात अशी अनेक पोषक घटक असतात ज्यामुळे बाळाचे आरोग्य निरोगी राहते. स्तनपानाचे बाळ आणि आई दोघांसाठीही असलेले फायदे सर्वश्रुत आहेत.

  • गालावर किस केल्याने एचआयव्ही होऊ शकतो का?

एचआयव्हीचा संसर्ग एवढ्या सहजपणेही होत नाही. त्यामुळे गालावर किस करणे हे अगदीच सुरक्षित आहे. दुसऱ्या व्यक्तीला लागण झालेली असली तरी, तुमची जखम नसलेली त्वचा हा विषाणूसाठी सर्वांत मोठा अडथळा आहे. कोरडे चुंबन, मिठी मारणे किंवा हातमिळवणे अशा सहज सामाजिक वर्तनातून हा संसर्ग पसरत नाही.

  • एचआयव्ही एड्ससाठी उपचार उपलब्ध आहेत का?

या आजारावर उपचार उपलब्ध नाहीत. मात्र एआरटी ( ART- Anti Retroviral Treatment) ही प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळे एचआयव्हीची लागण झालेल्या व्यक्तीचे आयुर्मान वाढू शकते आणि जीवनशैलीचा दर्जा देखील उंचावू शकतो.

रुग्णाला ART सुरू केल्यानंतर आयुष्यभर ही औषधे आणि उपचार घ्यावे लागतात. संपूर्ण भारतात ART केंद्रांमध्ये ही औषधे मोफत उलब्ध आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT