woman sets fire to fathers hut due to fight over extra marital affair two kids burnt to death in indore madhya pradesh dainikgomantak
देश

प्रेमसंबंधातून नवऱ्याशी भांडण, दोन निष्पाप चिमुरड्यांचा बळी

आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दोन्ही मुली आगीच्या विळख्यात होत्या

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये एका महिलेने झोपडीला आग लावून तिच्या दोन अल्पवयीन भाचींची हत्या केली. हे प्रकरण प्रेमसंबंधातून घडले असल्याचे सांगितले जात आहे. मृत झालेल्या दोन्ही मुली चार आणि सहा वर्षांच्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी 25 वर्षीय आरोपी बरखा मेडा हिला अटक केली आहे.

इंदूरचे पोलिस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा म्हणाले, "बरखाचे दुसरे लग्न झाले होते. तसेच तिचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअरही होते. याच मुद्द्यावरून बरखाचे तिच्या दुसऱ्या पतीसोबत अनेकदा भांडण झाले होते. भांडणाच्या वेळी बरखाच्या वडिलांनी तिला मुसकाडीत मारली, त्यामुळे ती चिडली.

रागावून झोपडी पेटवली

पोलीस (police) आयुक्तांनी सांगितले की, बरखाने संतापून आपल्या वडिलांची झोपडी पेटवून दिली. त्यावेळी बरखाच्या भावाच्या दोन्ही मुली झोपडीत झोपल्या होत्या. आग वेळीच आटोक्यात आणण्यात आली, मात्र तोपर्यंत दोन्ही मुली आगीच्या विळख्यात होत्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू (Death) झाला. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी मुलींचे पालक घरी नव्हते. या घटनेची माहिती मुलींच्या पालकांना मिळताच ते तातडीने तेथे पोहोचले. सध्या पोलिसांनी आरोपी बरखाला अटक केली असून तिची चौकशी सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IPL Jersey Stolen: BCCI च्या ऑफिसमध्ये 6.52 लाखांची चोरी; मुंबई, चेन्नईसह अनेक IPL संघांच्या जर्सी गायब, सुरक्षा व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: बाहेर जाणार्‍या दारूच्या बाटल्यांवर आता 'होलोग्राम'!

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

SCROLL FOR NEXT