Jabalpur Dainik Gomantak
देश

फूड डिलिव्हरी एजंटला महिलेने केली बुटाने मारहाण, व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला फूड डिलिव्हरी एजंटला मारहाण करताना दिसत आहे.

दैनिक गोमन्तक

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक महिला फूड डिलिव्हरी एजंटला मारहाण करताना दिसत आहे. ही घटना मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यातील आहे. डिलिव्हरी एजंटची दुचाकी तिच्या स्कूटीला धडकल्याने तिला दुखापत झाल्याचे महिलेचे म्हणणे आहे. व्हिडिओमध्ये महिला (Woman) डिलिव्हरी एजंटला बुटांनी मारहाण करताना दिसत आहे. तिथे उपस्थित लोक महिलेला थांबण्यास सांगत होते, मात्र महिलेने त्यांचे ऐकले नाही. एका प्रसंगी ती एजंटला लाथ मारतानाही दिसत आहे. (Woman beats street food delivery agent in Jabalpur video goes viral)

दरम्यान, सोशल मीडियावरील (Social Media) पोस्टनुसार, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, महिला स्वत: दुचाकी चालवत असताना फोनवर बोलत होती. डिलिव्हरी एजंट चुकीच्या बाजूने येत असल्याचेही काहींनी निदर्शनास आणून दिले. डिलिव्हरी एजंट चूकीच्या दिशेने येताना दिसत आहे. दुसरीकडे मात्र काही सोशल मीडिया यूजर्संनी महिलेवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

एका यूजरने म्हटले की, 'ही त्याची चूक होती, पण ज्याप्रकारे त्याचा अपमान करण्यात आला, ते समर्थनीय ठरु शकत नाही.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ajit Pawar Passed Away: "महाराष्ट्रानं कर्तबगार नेतृत्व गमावलं!" अजित पवारांच्या निधनावर गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसह दामू नाईक, युरींनी वाहिली श्रद्धांजली

Goa Farming: शेती क्षेत्रातून महत्वाची माहिती! गोव्यात खरीप हंगामातील भाजीपाला लागवड घटली; आकडेवारी उघड

Goa Opinion: पदोन्नतीचा पूर आणि कार्यक्षमतेचा दुष्काळ?

Goa Mining: '..अन्यथा खाणपट्टा बोलीला फटका'! निर्यातदार संघटनेचा इशारा; लोहखनिज निर्यातीवर शुल्क जाचक असल्याचा दावा

Ajit Pawar Plane Crash: आग, धूर अन् विमानाचे तुकडे...! महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताचे व्हिडिओ, फोटो समोर

SCROLL FOR NEXT