Wife's insistence on staying with husband at her place of posting is not cruelty: Chhattisgarh High Court. Dainik Gomantak
देश

पतीसोबत नोकरीच्या ठिकाणी राहण्याचा पत्नीचा आग्रह क्रूरता नाही: हायकोर्ट

Ashutosh Masgaunde

Wife's insistence on staying with husband at her place of posting is not cruelty says Chhattisgarh High Court:

छत्तीसगड उच्च न्यायालयाने नुकतेच सांगितले की, पत्नीने पतीसोबत कामाच्या ठिकाणी राहण्याचा आग्रह धरणे म्हणजे हिंदू विवाह कायद्यानुसार क्रूरता नाही.

न्यायमूर्ती गौतम भादुरी आणि न्यायमूर्ती दीपक कुमार तिवारी यांच्या खंडपीठाने वैवाहिक संबंधांमध्ये परस्पर आदर राखणे आवश्यक आहे यावर भर दिला.

खंडपीठाने सांगितले की, "हे स्पष्ट आहे की पत्नीने पतीसोबत राहण्याचा आग्रह धरला आणि कोणतेही योग्य कारण न देता, पतीने तिला नियुक्तीच्या ठिकाणी ठेवण्यास नकार दिल्यास, असे मानले जाऊ शकत नाही, पत्नीने पतीवर क्रूरता केली."

म्हणून, न्यायालयाने जांजगीर येथील कौटुंबिक न्यायालयाच्या 28 जून 2019 च्या आदेशाला आव्हान देणारे पतीने दाखल केलेले अपील फेटाळून लावले, ज्यात क्रूरतेच्या कारणास्तव घटस्फोट देण्यास नकार दिला होता.

या जोडप्याने 19 मे 2005 रोजी लग्न केले. ते काही काळ आनंदाने राहिले पण हळूहळू त्यांच्या नात्यात कटुता आली. पतीने आरोप केला आहे की, पत्नी सासरच्यांपासून वेगळे राहण्याचा आग्रह करत होती. तसेच पती जेव्हा तिच्या या मागणीला विरोध करायचा तेव्हा ती भांडण करायची.

पतीने पुढे असा दावा केला की, पत्नीने जून 2009 मध्ये स्वेच्छेने सासरचे घर सोडले आणि डिसेंबर 2009 मध्ये परत आली. पुन्हा तिने कोणतेही कारण नसताना सासरचे घर सोडले.

2012 मध्ये आई आणि 2015 मध्ये वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने तिला सासरच्या घरी परतण्याची विनंती केली तेव्हा तिने परत येण्यास नकार दिला, असा आरोप पतीने केला होता.

दुसरीकडे पत्नीने असा युक्तिवाद केला की, लग्नानंतर ती आणि तिचा पती फक्त पाच वर्षे आनंदाने जगले. मात्र, तिने आपल्या पतीला आपल्या पोस्टिंगच्या ठिकाणी नेण्याचा आणि तिथेच राहण्याचा आग्रह धरला असता, त्याने तसे करण्यास नकार दिला. तिने आरोप केला आहे की, 2010 पासून तो तिच्याकडे दुर्लक्ष करू लागला आणि त्यामुळे तिने सासरचे घर सोडले.

युक्तिवाद ऐकल्यानंतर खंडपीठाने सांगितले की, पतीने स्वत: पत्नीला त्याच्या पोस्टिंगच्या ठिकाणी त्याच्यासोबत राहण्याची विनंती नाकारली होती. आणि यासाठी त्याने कोणतेही योग्य कारण दिलेले नाही.

न्यायालयाने 25 सप्टेंबर रोजी दिलेल्या आपल्या आदेशात म्हटले आहे की, "जेव्हा पत्नीला पती त्याच्यासोबत राहू देत नव्हता तेव्हा अशा सक्तीच्या परिस्थितीत, जर पत्नी तिच्या पालकांच्या घरी वेगळी राहात असेल याला अयोग्य म्हणता येणार नाही. पतीने माहेरी गेलेल्या पत्नीला पुन्हा सासरी आणण्यासाठी कोणते प्रयत्न किंवा न्यायलयात कोणताही अर्ज दाखल करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत, तर घटस्फोटासाठी हे पुरेसे ठरत नाही."

त्यामुळे खंडपीठाने अपील फेटाळून लावले आणि पतीने पत्नीला मासिक 15,000 रुपयांची अंतरिम पोटगी देण्याचे निर्देश दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT