Why Zojila Tunnel is important for the country Dainik Gomantak
देश

Zojila Tunnel देशासाठी का आहे महत्वाचा

झोजिला बोगदा (Zojila Tunnel) हा आशियातील सर्वात लांब बोगदा आहे.

दैनिक गोमन्तक

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आज विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. झोजिला बोगदा (Zojila Tunnel) हा आशियातील सर्वात लांब बोगदा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर श्रीनगर -लेह-लडाख महामार्ग हिवाळ्यात जोरदार होणाऱ्या बर्फवृष्टी (Snowfall) दरम्यान बंद होणार नाही. यामुळे लडाखला जाणे सोपे होईल. लडाख यापुढे उर्वरित भारतापासून आता वेगळे राहणार नाही. यात 18 किमी लांबीचा रस्ता देखील तयार केला जाईल. झेड मोड बोगद्यांपासून झोजिला बोगद्यापर्यंत जाईल. या रस्त्यावर अशा हिमस्खलन संरक्षण संरचना बांधल्या जात आहेत. जे दोन बोगद्यांमधील हवामानातील संतुलन राखेल. झोजिला बोगदा का खास आहे हे जाणून घेवूया.

* कुतुबमिनारच्या 5 पट उंचीवर आहे बोगदा

झोजिला बोगदा आशियातील सर्वात लांब बोगदा असल्याचे म्हंटले आहे. या बोगद्याचा पाया 2018 मे मध्येच ठेवण्यात आला होता, परंतु IL&FSया निविदा कंपनीचे दिवाळे निघाले. त्यानंतर हैदरबादच्या मेघा अभियंतत्रीकीला कंत्राट देण्यात आले. ज्या ठिकाणी बोगदा बांधला जात आहे. तो कुतुब मिनारपेक्षा 5 पट उंच आहे. हा बोगदा झोजिला खिडीजवळ सुमारे 3000 मीटर उंचीवर NH-1 येथे बाधला जात आहे.

* साडेतीन तासाचा प्रवास 15 मिनिटांमध्ये

हा बोगदा सुमारे 14. 15 किमी लांब आहे. हे आशियातील सर्वात लांब बोगदा असल्याचे सांगण्यात आले आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर जे अंतर कापण्यासाठी साडेतीन तास लागतात, ते अवघ्या 15 मिनिटांमध्ये पूर्ण केले जातील.

* भारतीय लष्कराणांसाठी हा प्रकल्प महत्वाचा

हा बोगदा सामान्य जनतेसाठी आणि पर्यटकांसाठी तसेच भारतीय सैन्यासाठी खूप महत्वाचा आहे. हा बोगदा पूर्ण झाल्यावर लडाख सर्व हंगामात काश्मीर खोऱ्याशी संपर्कात राहील. श्रीनगर, द्रास, कारगिल आणि लेहचे क्षेत्र जोडलेले राहतील. या बोगद्याला महत्व असण्याचे कारण म्हणजे सैन्यासाठी हा रस्ता सियाचीनकडे जातो. आगामी काळात श्रीनगर-कारगिल-लेह या मार्गावर हिमस्खलनाची भीती राहणार नाही.

* अनेक सुरक्षा उपाय

  • बोगद्याच्या आत प्रत्येक 750 मीटर अंतरावर रस्त्याच्या दोन्ही बाजूने आपत्कालीन ले-बाय असतील. कॅरेजवेच्या दोन्ही बाजूंना साइडवाक्स असतील.

  • युरोपीयन मानकांनुसार, बोगद्याच्या आत प्रत्येक 125 मीटरवर आपत्कालीन कॉलिंग सुविधा असेल.

  • संपूर्ण बोगद्यामध्ये स्वयंचलित फायर डिटेक्शन सिस्टम बसवली जाईल आणि मॅन्युअल फायर अलार्मसाठी सुद्धा एक बटन असेल.

  • बोगद्याच्या भिंतीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. बोगद्याच्या दोन्ही बाजूने खांब लावून कॅमेरे बसवले जातील.

  • सीसीटीव्ही फुटेज नियंत्रण कक्षाला पाठवले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT