Indore Attack Dainik Gomantak
देश

Indore Attack: हिंदु मुलासोबत का गेलीस? म्हणत युवतीला दमदाटी; 50 जणांच्या जमावाची युगुलूला मारहाण

इंदुरमधील धक्कादायक प्रकार; मुलीला बुरखा घालून घरीच राहण्याची धमकी

Akshay Nirmale

Indore Attack: मध्य प्रदेशची आर्थिक राजधानी असलेल्या त्यानंतर येथे आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हिंदू मित्रासोबत जेवायला गेलेल्या मुस्लीम मुलीवर 40 ते 50 मुलांनी हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. गुरूवारी रात्री ही घटना घडली.

मेडिकल कॉलेजचा विद्यार्थी असलेला भावेश सुनहरे हा त्याच्यासोबत शिकणाऱ्या नसरीन सुलताना या मैत्रिणीसोबत जेवायला बस स्टँडजवळील मदनी हॉटेलमध्ये गेला होता.

रात्रीचे जेवण करून दोघेही परतत असताना ग्वालटोली परिसरात त्यांना तरुणांच्या जमावाने घेरले. त्यांनी भावेश याचे आधार कार्ड मागितले आणि भांडण सुरू केले.

या वेळी नसरीनने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. तथापि, गोंधळ घालणाऱ्या तरुणांनी मुस्लिम तरुणीलाच खडसावले. तू रात्री बिगर मुस्लीम मुलासोबत का फिरत आहेस. तुझ्या घरच्यांनी यासाठी परवानगी दिली आहे का?

तरूणीने सांगितले की, ती स्वतःहून तिच्या मित्रासोबत जेवायला गेली होती. त्यावर जमावातील तरूणांनी विचारले की, बिगर मुस्लिम मुलासोबत जेवायला जायची काय गरज होती? तु हिजाब घालतेस पण इस्लामचे पालन करत नाहीस.

बुरखा घाल आणि घरीच राहा, एका बिगर मुस्लिम तरुणासोबत बाजारात फिरून तु आमच्या समाजाची मान खाली घालत आहेस. इस्लाम आणि शरिया कायद्याचे पालन कर. बुरखा घालूनच घराबाहेर पड, अशी दमदाटी या गुंडांनी त्या तरूणीला केली.

हे सांगत असताना भावेशने त्या तरूणांना अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावर तिथे 40 ते 50 तरूण जमा झाले. त्यांच्यापासून सुटका करून घेत ते दोघे धेनू मार्केटमधून बाल विनय मंदिर शाळेच्या दिशेने धावले.

पण गुंडांनी त्यांना मारहाण करून राजकुमार पुलाच्या दिशेने नेले. तिथे काही लोकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण गुंडांनी मध्यस्थी करणाऱ्यांनाही धक्काबुक्की केली.

यात भावेशला गंभीर दुखापत झाली आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दोघा तरूणांना अटक केली आहे. या प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. पोलिसांनी व्हिडिओ फुटेजच्या सहाय्याने तपास सुरू केला आहे.

दरम्यान, इंदुर येथे नुकतेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बजरंग दलाविरोधात वादग्रस्त पत्रके वाटली गेली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मुरगाव नगर परिषदेने सप्ताहासाठी घेतला २० कोटी रुपयांचा विमा

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT