Parkash Singh Badal Dainik Gomantak
देश

Parkash Singh Badal Passes Away: रेकॉर्डधारी CM प्रकाश सिंह बादल, 13 वेळा लढवली होती विधानसभा निवडणूक!

Who Was Parkash Singh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले, ते दीर्घकाळ आजारी होते.

Manish Jadhav

Who Was Parkash Singh Badal: पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले, ते दीर्घकाळ आजारी होते.

प्रकाश सिंह बादल यांनी चंदीगडच्या फोर्टिस रुग्णालयात (Hospital) अखेरचा श्वास घेतला. प्रकाश सिंह बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील मुक्तसर जिल्ह्यातील अबुल खुराना गावातील जाट शीख कुटुंबात झाला होता.

प्रकाश सिंह बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री राहिले आहेत. याशिवाय, ते केंद्र सरकारमध्ये मंत्रीही राहिले आहेत.

13 वेळा विधानसभा निवडणूक लढवली

2022 च्या पंजाब (Punjab) विधानसभा निवडणुकीत प्रकाश सिंह बादल हे राज्यातील सर्वात जुने उमेदवार होते, परंतु दिवंगत खासदार जगदेव सिंह खुदियान यांचे पुत्र गुरमीत सिंह खुदियान यांच्याकडून त्यांना पराभव पत्कारावा लागला होता.

बादल यांची ही 13 वी विधानसभा निवडणूक होती. विशेष म्हणजे, याआधीही बादल यांनी अनेक विक्रम केले होते. 1952 मध्ये बादल गावातून निवडून आले तेव्हा ते सर्वात तरुण सरपंच होते.

याशिवाय, ते 1970 मध्ये राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री बनले. पण त्याचवेळी ते 2012 मध्ये सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्रीही बनले.

पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री झाले

8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यातील अबुल खुराना गावात जन्मलेल्या बादल यांनी 1947 मध्ये शिरोमणी अकाली दल (एसएडी) पक्षाचे सदस्य म्हणून राजकीय कारकीर्द सुरु केली.

बादल त्यांच्या राजकीय कारकिर्दीत पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पहिल्यांदा 1970 ते 1971, त्यानंतर 1977 ते 1980, त्यानंतर 1997 ते 2002 या काळात तिसऱ्यांदा आणि पुन्हा 2007 ते 2012 आणि 2012 ते 2017 अशा एकूण पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले. ते लोकसभेचे सदस्यही होते.

प्रकाश सिंह बादल हे 1977 मध्ये पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये केंद्रीय कृषी आणि पाटबंधारे मंत्री होते.

जमीनदार कुटुंबात जन्म झाला

बादल यांचा जन्म एका जमीनदार शेतकरी कुटुंबात झाला. लाहोरच्या (आता पाकिस्तानात) फोरमॅन ख्रिश्चन कॉलेजमधून त्यांनी बीए केले.

राजकारणात त्यांचा पहिला प्रवेश 1947 मध्ये झाला जेव्हा, ते त्यांच्या गावचे नेते म्हणून निवडून आले. 1957 मध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (काँग्रेस पक्ष) चे सदस्य म्हणून पंजाब विधानसभेवर निवडून आले.

काही वर्षांनंतर त्यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी मतभेद झाल्याने पक्ष सोडला आणि एसएडीमध्ये प्रवेश केला.

1967 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला, परंतु 1969 मध्ये पुन्हा जिंकून आणि राज्यात एसएडीच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सामील होऊन ते परतले. वर्षभरानंतर त्यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. मात्र, त्यांचे सरकार केवळ वर्षभरच टिकले.

पंजाब विधानसभेवर वारंवार निवडून आले

बादल 1969 ते 2012 पर्यंत पंजाब विधानसभेवर वारंवार निवडून आले. 1992 हा एकमेव अपवाद होता. अकाली दलाने त्या वर्षी राज्य निवडणुकांवर बहिष्कार टाकला होता.

याशिवाय, बादल यांना 1975-77 च्या आणीबाणीच्या काळात अनेक वळा तुरुंगवासही भोगावा लागला. 1977 च्या सुरुवातीला ते लोकसभेवर (संसदेचे कनिष्ठ सभागृह) निवडून आले आणि पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री बनले.

सलग दोन वेळा पंजाबचे मुख्यमंत्री बनले

2007 च्या निवडणुकीत, अकाली दलाने भारतीय जनता पक्षासोबत युती केली आणि विधानसभेच्या बर्‍याच जागा जिंकल्या.

बादल यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले. 2012 च्या विधानसभा निवडणुकीतही दोन्ही पक्ष मित्रपक्ष राहिले आणि पुन्हा बहुमत मिळवले. बादल यांनी आपले पद कायम ठेवत सलग दोन वेळा मुख्यमंत्रीपद भूषवणारे पंजाबमधील पहिले व्यक्ती ठरले.

ते देशातील सर्वात वयोवृद्ध मुख्यमंत्रीही ठरले. 2008 मध्ये त्यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि त्यांचे पुत्र सुखबीर सिंह बादल त्यांच्यानंतर अध्यक्षपदी विराजमान झाले.

2012 च्या प्रचारादरम्यान, ज्येष्ठ बादल यांनी जाहीर केले की, ही त्यांची शेवटची निवडणूक असेल परंतु त्यांनी मागील वर्षीही निवडणूक लढवली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT