Mudasir Ahmad Shaikh Dainik Gomantak
देश

Republic Day 2023: कोण आहेत बिंदास मुदासीर? ज्यांच्या हौतात्म्यावर संपूर्ण काश्मीर रडले; शूरवीराला शौर्य चक्र...

दैनिक गोमन्तक

Mudasir Ahmad Shaikh: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी 74 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 15 शौर्य चक्रांसह 412 शौर्य पुरस्कारांना मंजुरी दिली. मुदासीर अहमद शेख हे शौर्य चक्र प्राप्त करणाऱ्यांपैकी एक आहेत. मुदासीर हे 25 मे 2022 रोजी बारामुल्ला येथे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. पण देशासाठी बलिदान देण्यापूर्वी मुदासीर यांनी असे काही केले की, ज्याचा संपूर्ण भारताला सदैव अभिमान वाटेल.

मुदासीर यांना मरणोत्तर शौर्य चक्र प्रदान करण्यात येणार आहे. अशोक चक्रानंतर कीर्ती चक्र हा भारतातील दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे. तर शौर्य चक्र हा देशातील तिसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार आहे.

कोण आहेत मुदासीर अहमद शेख?

मुदासीर अहमद शेख (Mudasir Ahmad Shaikh) हे जम्मू-काश्मीर पोलिसात हवालदार होते. 25 मे 2022 रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना ते शहीद झाले. 25 मे रोजी जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी भागात नजीभात क्रॉसिंगवर झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला होता. मात्र, या चकमकीत मुदासीर यांना आपला जीव गमवावा लागला.

दरम्यान, मुदासीर अहमद शेख यांच्या हौतात्म्यानंतर अनेक महिने त्यांचे चाहते, मित्र, ओळखीचे लोक त्यांच्या घरी शोक व्यक्त करण्यासाठी येत होते, असे सांगितले जाते. आपला शूर मुलगा गमावल्यानंतर संपूर्ण काश्मीर खोरे अस्वस्थ झाले होते.

त्यांच्या वडिलांनी सांगितले की, परदेशातही असे लोक आहेत, जे मुदासीरवर खूप प्रेम करतात. मुदासीरची बातमी ऐकून तेही अस्वस्थ झाले होते. मुदासीर यांचे घर उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यातील अतिदुर्गम उरी भागात आहे.

बिंदास भाई या नावाने संपूर्ण काश्मीर ओळखले जात होते

मुदासीर यांना 'बिंदास भाई' या टोपण नावाने ओळखले जायचे. J&K पोलिसात (Police) रुजू झाल्यानंतर काही महिन्यांनी, त्यांना हे नाव सामान्य जनांकडून मिळाले, कारण ते उदार मनाचे होते. मुदासीर नेहमीच लोकांना मदत करत असे. मुदासीर काश्मीरी तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत होते. ते अनेकदा आपल्या मित्रांना सरप्राईज देऊन सरप्राईज करत असे.

दुसरीकडे मात्र, त्यांच्या मृत्यूनंतर, मुदासीर यांचा भाऊ बासित मकसूद याने सांगितले होते की, बिंदास भाईचा मोबाईल नंबर बारामुल्ला-उरीमधील प्रत्येक कॅब चालकाकडे होता. त्या कॅब चालकांना कोणत्याही पोलिसांनी विनाकारण पकडले तर ते लगेच मुदासीर यांना फोन करायचे आणि तेही त्यांना मदत करायचे.

मुदासीर यांच्या भावाने पुढे सांगितले की, उरीमध्ये एका शाळेजवळ सर्च ऑपरेशन सुरु होते. तेव्हा मुदासीर भीड न बाळगता दहशतवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी शाळेमध्ये गेले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT