Crime news Dainik Gomantak
देश

Uttar Pradesh Crime: धक्कादायक! चहा मिळण्यास उशीर झाल्याने पतीने तलवारीने केली पत्नीची हत्या

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

Manish Jadhav

Uttar Pradesh Crime: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. इथे एका व्यक्तीने पत्नीने चहा देण्यास उशीर केल्यामुळे तलवारीने वार केले. गाझियाबादच्या मोदीनगर भोजपूर पोलीस ठाण्यात ही घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला खुनाच्या आरोपाखाली अटक केली. याशिवाय, त्याच्याकडून खुनात वापरलेले शस्त्रही जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपीने मयत महिलेवर अनेकदा वार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेवर अनेक वेळा वार झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख धरमवीर अशी केली आहे. सकाळी धर्मवीरने पत्नीकडे चहा मागितला असता तिने चहा तयार करण्यास थोडा वेळ लागेल असे सांगितले, असे पोलिस तपासात समोर आले आहे. यानंतर दोघांमध्ये बाचाबाची सुरु झाली.

यानंतर आरोपीने पत्नीवर हल्ला केला. दरम्यान महिलेची आरडाओरडा ऐकून गावकरी तिच्या घराकडे धावले. त्यांना पीडिता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आढळली. सहायक पोलिस आयुक्त (एसीपी) ज्ञान प्रकाश राय यांनी सांगितले की, धर्मवीर आणि त्याची पत्नी यांच्यात चहा बनवण्यावरुन भांडण झाले. त्यानंतर धर्मवीरने धारदार शस्त्र काढून तिच्यावर वार केल्याने जागीच मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Adil Shahi Dynasty: युसूफ भारताकडे निघाला, 1461 मध्ये दाभोळ बंदरावर पोहोचला; आदिलशाही व तुर्की सल्तनत

Aamir Khan Video: पहिल्यांदाच जगासमोर आलं 'मिस्टर परफेक्शनिस्ट'चं हिडन टॅलेन्ट, VIDEO पाहून विश्वासच बसणार नाही!

अपमानास्पद भाषा, ईदच्या सजावटीची नासधूस, एकता नगरात तणाव; पोलिसांनी महिलेला घेतलं ताब्यात

Borim Accident: बोरीत काँक्रेटवाहू ट्रकची कारला धडक, 6 जण जखमी; 12 वर्षीय मुलीचा समावेश

''गोवा में 15 साल भाजप आ नहीं सकती''; दिगंबर कामतांचा Video Viral, मुख्यमंत्र्यांनी वाजवल्या टाळ्या; नेटकरी थक्क!

SCROLL FOR NEXT