Whatsapp  Dainik Gomantak
देश

Whatsapp Services Restored: जगभरात तब्बल दीड तास व्हॉटस्अॅप ठप्प

96 मिनिटांनंतर पुन्हा झाले सुरू; केंद्र सरकारने मेटा कंपनीकडून मागवला अहवाल

गोमन्तक डिजिटल टीम

Whatsapp Services Restored: आपल्या दैनंदिन जीवनाचा महत्वाचा भाग बनलेल्या व्हॉटस्अॅपची सेवा मंगळवारी दुपारी अचानकच ठप्प झाली. दुपारी साडे बारा वाजता व्हॉट्सअॅप बंद पडले होते, त्यानंतर जवळपास दीड तासाने दुपारी 2 वाजून 6 मिनटांनी व्हॉटस्अॅपची सेवा पुर्ववत झाली.

भारतात महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेशसह अनेक राज्यातील व्हॉटस्अॅप सेवा या काळात ठप्प होते. केंद्र सरकारने व्हॉटस्अॅपच्या पॅरेंट कंपनी असलेल्या मेटा कडून याबाबत अहवाल मागितला आहे. भारतातील बहुतांश सर्व मेट्रो सिटीमध्ये ही सेवा ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांना मेसेजेस एकमेकांना पाठविण्यात अडचणी आल्या.

अनेक युजर्सनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबाबत मते व्यक्त केली. ट्रॅकर डाऊन डिटेक्टर या वेबसाईटने ही मेसेंजर सर्व्हिस बंद असल्याची माहिती दिली. व्हॉटसअॅप डाऊन झाल्याचा ट्रेंड ट्विटरवर ट्रेडिंगमध्ये राहिला.

जगभरात व्हॉटस्अॅपचे २०० कोटीहून अधिक मासिक युजर्स आहेत. व्हॉटस्अॅप बंद पडल्यानंतर एका तासाने मेटा कंपनीच्या प्रवक्त्यांनी याबाबत माहिती दिली. काही लोकांना व्हॉटस्अॅपवरून मेसेज पाठविण्यात अडचणी येत आहेत. आम्ही सेवा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत आहोत, असे प्रवक्तयाने सांगितले. पण हे कशामुळे झाले, याचे कारण मात्र सांगितले नाही.

दरम्यान, गेल्या वर्षी 4 ऑक्टोबर 2021 रोजी जवळपास सहा तास जगभरात व्हॉटस्अॅप, फेसबूक आणि इन्स्टाग्राम डाऊन झाले होते. त्यामुळे अब्जावधी युजर्सना अडचणींचा सामना करावा लागला होता. याचा परिणाम अमेरिकन शेअर मार्केटवरही झाला होता. फेसबुकच्या शेअर किंमतीत 6 टक्के घट झाली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT