Dextromethorphan hydrobromide cough syrup Dainik Gomantak
देश

सहा मुलांचा जीव घेणारे खोकल्याचे औषध नक्की काय आहे? ते कोणाला दिले जाते आणि आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात? वाचा सविस्तर

Dextromethorphan hydrobromide cough syrup: १९५० मध्ये डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड या औषधाचा शोध लावण्यात आला. कोरडा खोकला असल्यास हे औषध रुग्णाला दिले जाते.

गोमंतक ऑनलाईन टीम

राजस्थानमध्ये कथितपणे खोकल्याचे औषध घेतल्याने सहा लहान मुलांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गेल्या काही दिवसांपूर्वी उघडकीस आली. याशिवाय भरतपूर आणि जयपूरमध्ये देखील दोन मुलांची तब्येत यामुळे बिघडल्याचे सांगितले जाते. समोर आलेल्या या घटनांनंतर राजस्थानच्या एफडीएने या खोकल्याच्या औषधावर बंदी घालून, औषधाचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम करणाऱ्या या औषधाचे डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड असे नाव आहे. खोकल्यासाठी देण्यात येणारे हे औषध वादात सापडले असून, याबाबत विविध प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, हे औषध नक्की काय आहे? कोणाला किती प्रमाणात ते दिले जाते? आणि याचे आरोग्यावर दुष्परिणाम काय आहेत? याची माहिती आपण या लेखातून घेणार आहोत.

डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड सीरप नक्की काय आहे?

१९५० मध्ये डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड या औषधाचा शोध लावण्यात आला. कोरडा खोकला असल्यास हे औषध रुग्णाला दिले जाते. खोकल्यासाठी कारणीभूत असणाऱ्या विषाणूंविरोधात हे काम करते, यामुळे रुग्णाला काही प्रमाणात दिलासा मिळतो. रासायनिक प्रक्रियेद्वारे हे औषध तयार केले जाते आणि सीरप स्वरुपात ते लहान तसेच प्रौढांना दिले जाते.

डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड कोणाला दिले जाते?

डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइड खोकल्यासाठी दिले जाणारे हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतले जावे, असा सल्ला वैद्यकीय तज्ञ देतात. दोन वर्षांपेक्षा लहान मुलांना हे औषध अजिबात देऊ नये. २ ते ६ वयोगटातील मुलांना ते योग्य प्रमाणात दिले जावे तर, सहा वर्षापेक्षा मोठ्यांना वैद्यकीय तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार देण्यात यावे, असे डॉक्टर सांगतात. या औषधामुळे रुग्णाला दिलासा मिळतो जेणेकरुन रुग्णाला शांत झोप लागते.

डेक्सट्रोमेथोर्फन हायड्रोब्रोमाइडचे आरोग्यावर काय दुष्परिणाम होतात?

औषध घेतल्यानंतर रुग्णांला झोप, चक्कर येणे किंवा पोटदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. अपवादात्मक घटनांमध्ये काहींना श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो. रुग्णाला लिव्हर, किडनी संबंधित काही तक्रारी असतील तर त्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला जावा. दरम्यान, हे औषध घेताना नेहमी वैद्यकीय सल्ला घ्यावा त्याशिवाय औषध घेऊ नये असे तज्ञांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT