West Bengal bomb blast Dainik Gomantak
देश

मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, चार जखमी

दरोडेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी जखमी

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगालच्या बीरभूममध्ये मैदानात खेळणाऱ्या मुलांनी चेंडू समजून बॉम्ब उचलला. मुलांनी बॉम्ब उचलताच मोठा स्फोट झाला. या स्फोटात चार मुले जखमी झाली. शेतात स्फोट झाल्याचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक तेथे जमा झाले आणि त्यांनी सर्व जखमी मुलांना रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नजमा, रुजिया आणि रहीमा, आथिया अशी जखमींची नावे आहेत.

घटनेच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, गावातील मोनीर शेख नावाच्या व्यक्तीच्या घराच्या मागे हा स्फोट झाला. दुपारी काही मुले तिथे खेळत होती. त्यानंतर एका मुलाने तो बॉम्ब बॉल म्हणून उचलला आणि बॉम्बचा (bomb) स्फोट झाला. त्याचवेळी असा बॉम्बस्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. पश्चिम बंगालमधून अनेकदा अशा स्फोटांच्या बातम्या येत असतात.

आसनसोलच्या राणीगंजच्या रामबागनमध्ये रविवारी रात्री दरोड्याच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली होती. पोलिस (police) आणि दरोडेखोरांमध्ये झालेल्या गोळीबारात एक पोलिस कर्मचारी आणि एक दरोडेखोर जखमी झाला. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दारूगोळ्यासह आधुनिक सॉकेट बॉम्बही जप्त करण्यात आला आहे. राणीगंजमधील एका निर्जन ठिकाणी नंतर बॉम्बचा स्फोट करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT