Fire Dainik Gomantak
देश

पश्चिम बंगाल: उपसरपंचांची हत्या; संतप्त समर्थकांनी 8 जणांना जिवंत जाळले

पश्चिम बंगालमध्ये राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येचा सिलसिला सुरूच असताना बीरभूम जिल्ह्यात एक धक्कादायक घटनाा घडली आहे.

दैनिक गोमन्तक

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येचा सिलसिला सुरूच असताना बीरभूम (Birbhoom) जिल्ह्यात एक धक्कादायक घटनाा घडली आहे. येथील रामपूर हाट येथील बागुटी (Baguti Village) गावात पंचायतीचे उपसरपंच भादू शेख यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी अनेक घरांना आग लावली. यामुळे 8 जण जिवंत जाळले गेले.

'द टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, भादू शेख हे बरोसालच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच होते. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 वर त्यांचे दुकान आहे. त्याचवेळी 2 दिवसांपूर्वी ते बसले असताना त्यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला होता. जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण त्यांना मृत घोषीत करण्यात आले. त्यामुळे त्यांचे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी बागुटी गावात आग लावली. भादू शेख याच्यावर गावातील काही लोकांनी हल्ला केला असावा, असा संशय त्यांच्या कार्यकर्त्यांना होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री जाळपोळीची घटना घडली. जमावाने सुमारे 12 घरांना आग लावली. एवढेच नाही तर कोणीतरी अग्निशमन विभागाला जाळपोळीची माहिती दिल्यावर जमावाने अग्निशमन दलालाही घटनास्थळी पोहोचू दिले नाही. नंतर मोठ्या कष्टाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर 8 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यापैकी 7 मृतदेह एकाच घरातून सापडले आहेत. या घटनेत मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

भादू शेख खून प्रकरणात आतापर्यंत 1 संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याची चौकशी सुरू आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. जाळपोळीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध व शोध सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

SCROLL FOR NEXT