Yashtika Acharya Death Dainik Gomantak
देश

Yashtika Acharya Death: 270 Kg वजन मानेवर पडलं! गोव्यात 'गोल्ड' जिंकणाऱ्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनचा मृत्यू; Watch Video

Yashtika Acharya Death : यष्टिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Pramod Yadav

राजस्थान: बिकानेर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जिममध्ये पॉवरलिफ्टिंगचा सराव करताना राष्ट्रीय खेळाडू यष्टिका आचार्य हिचा मृत्यू झालाय. यष्टिकाने मानेवर 270 किलो वजन उचलले होते. यादरम्यान अचानक हात निसटल्याने त्याचा तोल गेला आणि त्याचा तोल त्याच्या मानेवर पडला. तोल गेल्याने त्याची मान मोडली. अपघातानंतर यष्टिकाला रुग्णालयात नेण्यात आले. जिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

यष्टिकाने गोव्यात झालेल्या ३३व्या राष्ट्रीय बेंच प्रेस चॅम्पियनशिपमध्ये सुसज्ज गटात सुवर्णपदक आणि क्लासिक प्रकारात रौप्य पदक जिंकले होते. यष्टिकाचे वडील ऐश्वर्या आचार्य (५०) हे कंत्राटदार आहेत. यष्टिकाच्या मृत्यूनंतर कुटुंबात शोककळा पसरली आहे.

कसा झाला अपघात?

बिकानेरची राष्ट्रीय महिला पॉवर लिफ्टर यष्टिका आचार्य (१७) ही राजस्थानमधील बिकानेर येथील नथुसर गेट येथील बडा गणेश मंदिराजवळील पॉवर हेक्टर जिममध्ये सराव करत होती. मानेवर तिने 270 किलोचे वजन उचलले. या वेळी यष्टिकाचा मानेवर वजन पडल्याने तिचा मृत्यू झाला. यष्टिका नेहमीप्रमाणे प्रशिक्षकाच्या उपस्थितीत सराव करत असताना ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

सरावाच्या वेळी हात घसरल्याने तिचा अचानक तोल गेला आणि 270 किलो वजनाचा रॉड तिच्या मानेवर पडला. यष्टिकाच्या मागे उभा असलेला प्रशिक्षकही मागे पडला. अपघातानंतर यष्टिका बेशुद्ध झाली. उपस्थित खेळाडूंनी यष्टिकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

याप्रकरणी कुटुंबीयांनी अद्याप कोणतीही तक्रार दिली नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. त्यामुळे या प्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT