High Court Dainik Gomantak
देश

Delhi HC: बलात्काराचा खोटा आरोप, उच्च न्यायालयाचा आदेश- 'महिलेने अंध मुलांची सेवा करावी'

Delhi High Court: या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार महिला आणि आरोपी यांच्यातील परस्पर सामंजस्याने बलात्काराचा खटला रद्द केला.

दैनिक गोमन्तक

Delhi High Court: पैशाच्या वादातून बलात्काराचा खोटा खटला दाखल करणाऱ्या महिलेचे वर्तन अन्यायकारक असल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने अशा प्रवृत्तीला आळा घालण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. या प्रकरणात न्यायालयाने तक्रारदार महिला आणि आरोपी यांच्यातील परस्पर सामंजस्याने बलात्काराचा खटला रद्द केला. मात्र, अशाप्रकारचे वर्तन आणि कायद्याचा दुरुपयोग केल्याबद्दल न्यायालयाने महिलेला अंध मुलांच्या शाळेत दोन महिने सेवा देण्याचे आदेश दिले.

झाडांची काळजी घ्या

न्यायमूर्ती जसमीत सिंह यांनी या प्रकरणातील आरोपीला 50 झाडे लावून त्यांची पाच वर्षे काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाने हे प्रकरण रद्द करताना म्हटले की, 'पीडित महिलेचे वर्तन अत्यंत अयोग्य आहे.' न्यायालयाने पुढे सांगितले की, 'महिलेने (Woman) स्वत: मान्य केले की, ती मानसिक नैराश्यातून जात होती, परिणामी चुकीच्या सल्ल्याच्या आधारे आरोपीविरुद्ध (Accused) बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.'

दरम्यान, न्यायालयाने (Court) महिलेला समाजसेवा करण्याचे आणि अंध मुलांच्या शाळेत आठवड्यातून पाच दिवस तीन तास, दोन महिने काम करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबतच आरोपीला रोहिणी परिसरात 50 झाडे लावून त्यांची पाच वर्षे निगा राखण्याचे आदेश दिले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT