Beating Retreat Ceremony  Dainik Gomantak
देश

Wagah-Attari Border Beating Retreat: अटारी-वाघा बॉर्डरवर 'बीटिंग रिट्रीट'चा थरार video

गोमन्तक डिजिटल टीम

भारतात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजर होत आहे. देशात सर्वत्र देशभक्तीचे माहोल पहायला मिळत आहे. हर घर तिरंगा, तिरंगा रॅली असे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारताचा शेजारी पाकिस्तान देखील आज 75 वा स्वातंत्र्यदिन साजर करत आहे. भारत आणि पाकिस्तानच्या अटारी-वाघा बॉर्डरवर दरवर्षी 'बीटिंग रिट्रीट'चा थरार पहायला मिळतो. कोरोनाच्या दोन वर्षांच्या बंधनानंतर आज अटारी-वाघा बॉर्डरवर 'बीटिंग रिट्रीट'चा थरार पहायला मिळाला. मोठ्या संख्येने नागरिकांनी हा थरार पाहण्यासाठी गर्दी केली. (Wagah-Attari Border Beating Retreat ceremony)

भारत-पाकिस्तान सीमेवरील अटारी-वाघा बॉर्डरवर 'बीटिंग रिट्रीट' सोहळा नेहमीच सर्वांसाठी आकर्षणाचा विषय असतो. यावेळी दोन्ही देशाच्या जवानांनी थक्क करणाऱ्या चित्तथरारक कवायती केल्या जातात. भारतीय जवानांनी यावेळी चित्तथरारक कवायती सादर करत उपस्थितांची मने जिंकली. सीमेवर जमलेल्या हजारो भारतीयांनी 'जय हिंद' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा दिल्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. बीटिंग रिट्रीट सोहळ्या दरम्यान जवानांसह दोन्ही देशांतील नागरिकांमधील जोश आणि जल्लोष पाह्यला मिळाला.

दुपारपासूनच हजारो नागरिकांनी बीटिंग रिट्रीट सोहळा पाहण्यासाठी वाघा बॉर्डरवर गर्दी केली होती. आज संध्याकाळी या ठिकाणी दोन्ही देशातील जवानांच्या परेड सुरू झाल्या. यावेळी बीएसएफचे अनेक बडे अधिकारी अटारी सीमेवर तैनात करण्यात आलेल्या गेटवर पोहोचले होते. या सोहळया दरम्यान बीएसएफ जवानांनी कवायती करताना आपल्या शौर्याची झलक दाखवली. बीएसएफच्या महिला सैनिकांनीही आपल्या शौर्य आणि धाडसाचे प्रात्यक्षिक दाखवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT