Visakhapatnam School Student Death Case Dainik Gomantak
देश

"मॅडम, मारु नका!" हात जोडून गयावया करु लागला, रडत-रडत बेशुद्ध पडला... शिक्षिकेच्या मारहाणीनंतर 6 वर्षांच्या मुलाचा मृत्यू VIDEO

Visakhapatnam School Student Death Case: एका खासगी शाळेत एलकेजीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली.

Manish Jadhav

Visakhapatnam School Student Death Case: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका खासगी शाळेत एलकेजीमध्ये शिकणाऱ्या अवघ्या 6 वर्षांच्या चिमुकल्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. होमवर्क पूर्ण न केल्याच्या कारणावरुन वर्गशिक्षिकेने रागवल्यामुळे आणि कानशिलात लगावल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप पालकांनी केला. या घटनेने परिसरात आणि शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली.

घटनेच्या दिवशी मुलगा सुदृढ आणि आनंदी होता, असा दावा पालकांनी केला. शाळेतून कोणतीही पूर्वसूचना किंवा फोन न आल्याने संशय आल्यावर पालकांनी शाळेत जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्या फुटेजमध्ये धक्कादायक वास्तव समोर आले. वर्गशिक्षिकेने मुलाला होमवर्कवरुन ओरडण्यास सुरुवात केली, ज्यामुळे घाबरलेला चिमुकला गयावया करत हात जोडून रडू लागला. शिक्षिकेने त्याचे कपडे नीट केले आणि त्याच्या कानशिलात लगावली. या मारहाणीनंतर लगेचच तो बेशुद्ध होऊन पडला.

शिक्षिकेने त्याला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र शरीरात कोणतीही हालचाल न दिसल्याने घाबरलेल्या शिक्षिकेने इतर कर्मचाऱ्यांना बोलावले. मुलाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

याप्रकरणी संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत शिक्षिकेच्या मारहाणीमुळे आणि भीतीमुळेच मुलाचा जीव गेल्याचा आरोप केला. शिक्षिका आणि शाळा व्यवस्थापनावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 194 अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अधिक पुरावे गोळा करण्यासाठी शिक्षिका आणि शाळा कर्मचाऱ्यांची चौकशी सुरु केली. मुलाच्या मृत्यूचे नेमके कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, आंध्र प्रदेशचे मानव संसाधन विकास मंत्री नारा लोकेश यांनी या दुर्दैवी घटनेवर तीव्र दुख व्यक्त केले. शिक्षिकेच्या मारहाणीनंतर बालकाचा मृत्यू होणे ही अत्यंत भयानक घटना असल्याचे सांगत त्यांनी दोषींवर आणि शाळा प्रशासनावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच राज्य सरकार पीडित कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असा दिलासाही त्यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT