Women Fighting Viral Video: सोशल मीडिया हे आजच्या काळात मनोरंजनाचे मोठे व्यासपीठ बनले आहे. दररोज हजारो व्हिडिओ अपलोड केले जातात, त्यापैकी काही व्हिडिओ क्षणार्धात व्हायरल होतात. कधी गंमतीदार व्हिडिओ, कधी जुगाडचे, तर कधी मारामारीचे व्हिडिओ लोकांना खूप आवडतात. सध्या असाच एक दोन महिलांच्या भांडणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे, ज्याला पाहून नेटकरी विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका शेतात दोन महिलांमध्ये (Women) जोरदार हाणामारी सुरु असल्याचे दिसत आहे. दोघींमध्ये कशावरुन वाद झाला हे स्पष्ट झालेले नाही, पण दोघीही एकमेकींवर तुटून पडल्या आहेत. व्हिडिओत दिसते की, एक महिला दुसऱ्या महिलेचा पाय पकडून तिला खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. दोघीही बराच वेळ एकमेकींशी भांडत राहतात आणि नंतर खाली पडतात.
जमिनीवर पडल्यानंतरही दोघींनी हार मानली नाही. त्या लगेच उठतात आणि पुन्हा भांडायला लागतात. त्यांच्या भांडणाचा जोर इतका आहे की, त्यांना कोणीही थांबवताना दिसत नाही. त्या ठिकाणी एक माणूस आहे, पण तो भांडण थांबवण्याऐवजी व्हिडिओ शूट करत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हा व्हिडिओ एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया (Social Media) प्लॅटफॉर्मवर @Shanaya01786 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना, ‘पानिपतचे तिसरे युद्ध आपल्या चरम सीमेवर आहे’ (पानीपत का तृतीय युद्ध अपने चरम पर है) असे विनोदी लिहिले. या कॅप्शनमुळे व्हिडिओची चर्चा आणखी वाढली.
व्हिडिओला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज मिळाले असून नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने कमेंट केली, ‘ही लढाई खूपच स्फोटक आहे.' तर, एका युजरने या भांडणाला आंतरराष्ट्रीय स्तरावर घेऊन जाताना लिहिले, ‘मला आशा आहे की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) लवकरच या प्रकरणाची दखल घेईल’. आणखी एका युजरने ‘खूपच दमदार आहे’ अशी प्रतिक्रिया दिली.
एकंदरीत, या व्हिडिओवरुन हे स्पष्ट होते की, सोशल मीडियावर लोक केवळ गंभीर व्हिडिओच पाहत नाहीत, तर अशा प्रकारच्या विनोदी आणि अनपेक्षित घटनेवरही प्रतिक्रिया देऊन त्याचा आनंद घेतात. या दोन महिलांमधील भांडणाचे कारण जरी कळले नसले तरी, त्यांच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांना चांगलाच विरंगुळा दिला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.