Woman Performs Puja In Moving Train Dainik Gomantak
देश

Train Puja Viral Video: धावत्या ट्रेनमध्ये चक्क दिवा लावून पूजा; प्रवाशांनी रोखलं तरीही हट्ट कायम, व्हिडिओ होतोय व्हायरल

Woman Performs Puja In Moving Train: धावत्या रेल्वेत एका प्रवाशाने केलेल्या धोकादायक कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Sameer Amunekar

धावत्या रेल्वेत एका प्रवाशाने केलेल्या धोकादायक कृत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. थर्ड एसी (3AC) डब्यातील अपर बर्थवर बसून संबंधित प्रवाशाने पूजा करताना उघड्या ज्योतीचा दिवा पेटवला. या प्रकारामुळे इतर प्रवाशांमध्ये चिंता निर्माण झाली. त्यांनी त्याला वारंवार समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष केल्याचे व्हिडिओत दिसून येते.

चालत्या रेल्वेत उघडी ज्योत; प्रवाशांनी व्यक्त केली चिंता

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक प्रवासी आपल्या जागेवर पूजा करताना दिवा लावल्याचे दिसते. त्याचवेळी आसपासचे प्रवासी त्याला दिवा विझवण्याची विनंती करताना ऐकू येतात. काहींनी अग्निसुरक्षा यंत्रणा सक्रिय होऊ शकते, तसेच मोठा अपघात घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली. मात्र संबंधित व्यक्तीने कोणतीही प्रतिक्रिया न देता पूजा सुरूच ठेवल्याचे दिसते.

रेल्वे नियमांनुसार उघडी आग पूर्णपणे निषिद्ध

भारतीय रेल्वेच्या सुरक्षा नियमांनुसार रेल्वे डब्यात माचिस, लायटर किंवा कोणत्याही प्रकारची उघडी ज्योत वापरण्यास मनाई आहे. रेल्वेतील चादरी, पडदे, गाद्या आणि इतर साहित्य सहज पेट घेऊ शकते. त्यामुळे अशा प्रकारची कृती केवळ नियमांचे उल्लंघन नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेलाही गंभीर धोका निर्माण करू शकते.

विशेषतः धावत्या रेल्वेत अशा निष्काळजीपणामुळे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासन प्रवाशांना अग्निसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत असते.

सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर शेअर झाल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. धार्मिक श्रद्धेचा आदर असला तरी सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सुरक्षिततेशी तडजोड करता येणार नाही, असे मत अनेकांनी नोंदवले.

काही वापरकर्त्यांनी अशा प्रवाशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली. तर काहींनी रेल्वे प्रशासनाने अशा घटनांवर तत्काळ लक्ष देऊन नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करावी, असे म्हटले.

श्रद्धा आणि सुरक्षिततेत समतोल आवश्यक

धार्मिक श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे आवश्यक आहे. विशेषतः रेल्वेसारख्या गर्दीच्या प्रवासात निष्काळजीपणामुळे शेकडो प्रवाशांचे जीव धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे रेल्वेचे नियम पाळणे ही प्रत्येक प्रवाशाची सामूहिक जबाबदारी असल्याचे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT