Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: दोन सांडांच्या भांडणात निष्पाप मुलीचा अपघात, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, “टार्गेट पूर्ण!”

Bull Fight Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे एक मोठे साधन बनले आहे. लोकांना जेव्हाही कंटाळा येतो, तेव्हा ते मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात.

Manish Jadhav

Bull Fight Video: आजच्या काळात सोशल मीडिया हे मनोरंजनाचे एक मोठे साधन बनले आहे. लोकांना जेव्हाही कंटाळा येतो, तेव्हा ते मनोरंजनासाठी सोशल मीडियाचा वापर करतात. जर तुम्हीसुद्धा त्यापैकीच एक असाल आणि दररोज सोशल मीडियावर थोडा वेळ घालवत असाल, तर तुम्हीही अनेक व्हिडिओ पाहत असाल. प्रत्येक स्क्रोलनंतर तुमच्यासमोर काहीतरी नवीन आणि वेगळे येते. यातील काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की, हसू आवरणे कठीण होते. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) जोरदार व्हायरल होत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये (Video) दोन सांड एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. त्यांची ही लढाई नेमकी कशी सुरु झाली हे व्हिडिओत दिसत नाही, पण व्हिडिओची सुरुवात त्यांच्या भांडणानेच होते. व्हिडिओमध्ये रस्त्याच्या मधोमध दोन सांड एकमेकांना धडकी देत भांडत आहेत. त्यांचा हा संघर्ष सुरु असतानाच एक सांड दुसऱ्या सांडावर भारी पडतो आणि त्याला मागे ढकलतो. पण त्यांच्या भांडणात एक निष्पाप मुलगी सापडते.

ही मुलगी आपल्या स्कूटीवरुन जात असताना सांडांना भांडताना पाहून ती स्कूटी वळवून मागे जाण्याचा प्रयत्न करते. त्याचवेळी, त्यातील एक सांड तिला धडकतो. सांडाच्या धडकेत ती स्कूटीसह खाली पडते. हे सगळ इतकं अचानक घडतं की, ती गोंधळून जाते. मात्र, खाली पडल्यानंतर ती लगेचच सावरते.

नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ iamankit.____ नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. ही बातमी लिहेपर्यंत या व्हिडिओला 18 लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्संनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका यूजरने कमेंट करत लिहिले की, “दोघेही (सांड) असे वागू लागले जसे काही झालेच नाही.” दुसऱ्या एका यूजरने लिहिले, “दीदी अशी लगेच उभी राहिली जसे हे रोजचेच प्रकरण आहे.” आणखी एका यूजरने लिहिले, “यांना फक्त त्या मुलीला पाडण्याचे निमित्त हवे होते. टार्गेट पूर्ण झाले.”

हा व्हिडिओ केवळ अपघाताचा नसून त्यात घडलेल्या घटनांवरुन लोकांना हसू आवरता आले नाही. दररोज सोशल मीडियावर अशाप्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात, जे कधी अनपेक्षित घटना दाखवतात, तर कधी रोजच्या आयुष्यातील काही मजेशीर क्षण. हा व्हिडिओही याच प्रकारातला असून लोकांच्या मनोरंजनाचे साधन बनला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"मोदी विरोधकांना घाबरवतात म्हणून मी तसे म्हणालो", मल्लिकार्जुन खर्गेंचं 'त्या' जहरी टीकेवर स्पष्टीकरण; भाजपकडून माफीची मागणी कायम VIDEO

VIDEO: 'गुजराती अडाणी' नंतर आता पंतप्रधान मोदी 'आतंकवादी'! मल्लिकार्जुन खर्गे यांची जीभ पुन्हा घसरली; तामिळनाडूचं राजकीय वातावरण तापलं

PM Kisan 23rd Installment: ठरलं! 'या' दिवशी खात्यात जमा होणार 2,000 रुपये, आजच उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं अन्यथा पैसे अडकणार

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

SCROLL FOR NEXT