Viral Video  Dainik Gomantak
देश

Watch Video: हे 'मौलाना' बंदूकीच्या गोळ्या झाडून भूत मारतात, पाहा चक्रावून टाकणारा व्हिडिओ

एक मौलाना बंदूकीच्या गोळ्या झाडून एका महिलेच्या अंगातून भूत गायब करताना दिसत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Viral Video Maulana: ढोंगी बाबांची आणि अध्यात्मिक गुरूंची भारतात काही कमी नाही. विशेष म्हणजे अनेकजण अशा ढोंगी बाबांच्या ढोंगीपणाला सहज बळी देखील पडतात. कोणताच धर्म याला अपवाद नाही.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून, यात एक मौलाना बंदूकीच्या गोळ्या झाडून एका महिलेच्या अंगातून भूत गायब करताना दिसत आहेत. महिला देखील या ढोंगी मौलानाला बळी पडल्याचे दिसत आहे.

सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणवर सध्या हा व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत आहे. नेटकऱ्यांनी सर्वच सोशल प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. मौलानाने दोन प्रकारच्या नकली बंदूका हातात घेतल्या असून, त्यातून गोळ्यांचा आवाज येत आहे.

सुरूवातीला दोन लहान आकाराच्या पिस्तूल पुढे करून त्यातून लाईट लागत आहे व गोळ्यांचा आवज येत आहे. त्यानंतर हे मौलाना मोठ्या गन मशीन सारख्या नकलीच बंदूक हातात घेऊन 'अल्ला हू अकबर' असे म्हणत दोन्ही बंदूकीतून गोळ्या झाडतात.

दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मिडियावर तूफान व्हायरल झाला असून, लोक विविध प्रतिक्रिया देत आहेत. लोकांना या सर्व प्रकाराला हास्यास्पद म्हटले आहे. तसेच, याला ढोंगीपणा म्हणून देखील संबोधले आहे.

व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. काही लोकांनी हा व्हिडिओ उत्तर प्रदेश मधील असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. लोकांनी या व्हिडिओवर लोकांनी स्माईलीची प्रतिक्रिया दिली आहे.

काही लोकांनी अशा ढोंगीबाबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT