Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: डोळ्यांची फसवणूक करणारा भारतीय जुगाड तूफान व्हायरल, व्हिडिओ पाहून नेटकरीही अवाक; म्हणाले, 'गजब इंदूर नाही, तर गजब टाटा...'

Indore Jugaad Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना जेव्हा कधी काहीतरी हटके किंवा वेगळे दिसते, तेव्हा ते त्याचा व्हिडिओ बनवण्यात जराही वेळ लावत नाहीत.

Manish Jadhav

Indore Jugaad Video: आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात लोकांना जेव्हा कधी काहीतरी हटके किंवा वेगळे दिसते, तेव्हा ते त्याचा व्हिडिओ बनवण्यात जराही वेळ लावत नाहीत. अनेक लोक हे व्हिडिओ बनवून लगेच सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि काही व्हिडिओ तर इतके व्हायरल होतात की ते जगभर पाहिले जातात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, जो पाहणाऱ्यांच्या डोळ्यांना क्षणभर फसगत करणारा आहे.

दरम्यान, हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ (Video) रात्रीच्या वेळी रेकॉर्ड करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये एक वाहन रस्त्यावरुन जाताना दिसते आणि त्यावर लादलेला सामान पाहिल्यावर, अनेकांना हा मोठा मालवाहू ट्रक आहे की काय, असे वाटते. मात्र, इथेच लोकांची गफलत होते. कारण, प्रत्यक्षात तो कोणताही ट्रक नसून, मालवाहू छोटी व्हॅन आहे, ज्यावर इतका जास्त सामान लादण्यात आला आहे की मागून पाहिल्यास ती एखाद्या अवजड ट्रकाप्रमाणे भासते.

व्हॅनवर लादलेला हे सामान नेमके किती वजनाचे आहे, हे स्पष्ट झालेले नाही, पण हे दृश्य इतके अविश्वसनीय आहे की त्यामुळे व्हिडिओला प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर 'rajwadavolag' नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये, 'भाई ने लोडिंग रिक्शा को ही ट्रक बना दिया' असे लिहिले. या व्हिडिओवर 'गजब इंदौरी' असे लिहिलेले असल्याने हा व्हिडिओ इंदूर शहरातला असावा, असा अंदाज आहे.

बातमी लिहिली जाईपर्यंत या व्हिडिओला 15 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले. नेटकऱ्यांनी या व्हायरल व्हॅनवर विविध आणि मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करताना लिहिले, "गजब इंदूर नाही, तर गजब टाटा!" तर दुसऱ्या एका युजरने यामागचे कारण सांगण्याचा प्रयत्न करत लिहिले, "शहरात ट्रकची परवानगी नसेल न." या व्हॅनवर लादलेला सामान पाहून आणखी एका युजरने विचारले, "सुरुवातीला मागून पाहिल्यानंतर याला कोण कोण ट्रक समजले?" तर दुसऱ्या एका युजरने 'छोटा हाथी ही कहदे' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

या व्हिडिओमुळे, भारतीय रस्त्यांवरील जुगाड (Jugaad) आणि मालवाहतुकीच्या हटके पद्धती पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT