Elephant steps on biker viral video Dainik Gomantak
देश

Viral Video: देव तारी त्याला कोण मारी! हत्तीने दुचाकीस्वाराच्या छातीवर दोनदा ठेवला पाय, तरीही चमत्कारिकरीत्या वाचला तरुण; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल

Elephant steps on biker viral video: 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारा एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार-डेहराडून महामार्गावर एका दुचाकीस्वाराचा थेट हत्तीशी सामना झाला. विशेष म्हणजे, या हत्तीने तरुणाच्या पोटावर आणि छातीवर एकदा नव्हे, तर दोनदा आपला पाय ठेवला. त्यामुळे त्याचा जीव वाचणे जवळपास अशक्य असल्याचे वाटत होते. मात्र, या भीषण प्रसंगातून तो तरुण सुखरूप बाहेर पडला. या घटनेचा व्हिडीओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा आला आहे.

पहाटेच्या सुमारास महामार्गावर घडली घटना

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हरिद्वार-डेहराडून महामार्गावर हा प्रकार घडला. नेपाली फार्म परिसरातून एक दुचाकीस्वार जात असताना त्याची दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या दुभाजकाजवळ पडली. दुचाकीस्वारही दुभाजकाला लागून जमिनीवर कोसळला. त्याचवेळी जवळच्या जंगलातून एक विशाल हत्ती महामार्गावर आला. रस्त्यावर पडलेल्या तरुणाच्या अगदी जवळ हा हत्ती पोहोचला आणि त्यानंतर जे घडले ते पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्यांची घाबरगुंडी उडाली.

हत्तीने दोनदा छातीवर ठेवला पाय

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे, हत्तीने जमिनीवर पडलेल्या तरुणाच्या पोटावर आणि छातीच्या भागावर दोनदा आपला अवजड पाय ठेवला. एवढ्या मोठ्या प्राण्याचा पाय अंगावर पडल्याने तरुणाचा जीव धोक्यात आला होता. मात्र, या कठीण प्रसंगात त्याने विलक्षण संयम दाखवला. हत्तीच्या पायाखाली असतानाही त्याने शरीराची कोणतीही हालचाल केली नाही. तो अगदी शांतपणे जमिनीवर पडून राहिला. हत्तीला कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवू नये, यासाठी त्याने हालचाल टाळल्याचे व्हिडीओवरून दिसते.

हत्ती जंगलाच्या दिशेने जाताच तरुण उठला!

काही क्षणांच्या या थरारानंतर हत्तीने महामार्गावरून जंगलाच्या दिशेने जाण्यास सुरुवात केली. हत्ती आपल्यापासून दूर गेल्याची खात्री होताच संबंधित तरुण तातडीने उठून उभा राहिला. हा प्रसंग पाहणाऱ्या वाहनचालकांना सुरुवातीला तरुणाचा जीव वाचेल की नाही, याचीच चिंता होती. हत्ती निघून गेल्यानंतर तो स्वतःच्या पायावर उभा राहिल्याचे पाहून उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला. महामार्गावरून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी आपल्या गाड्या थांबवून हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला.

राजाजी व्याघ्र प्रकल्पाजवळील परिसरात घटना

ही घटना नेपाली फार्मजवळील हरिद्वार-डेहराडून महामार्गावर घडली. हा परिसर राजाजी व्याघ्र प्रकल्पाच्या जवळ असल्याने येथे अनेकदा हत्ती जंगलातून बाहेर पडून रस्त्यावर येतात. महामार्गावर लावलेल्या 'मसुरी ६१' या अंतरदर्शक फलकामुळे काही जण या घटनेला मसुरी रोडवरील घटना समजत होते. मात्र, व्हिडीओतील ठिकाण नेपाली फार्म परिसरातील असल्याचे सांगण्यात येत आहे.

कॅब चालकाने टिपला थरारक प्रसंग

या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण शिवा शर्मा नावाच्या कॅब चालकाने केले आहे. त्यांनी सांगितले की, त्या दुचाकीस्वाराचे नशीब इतके बलवत्तर होते की, हत्तीसारख्या महाकाय प्राण्याच्या पायाखालूनही तो जिवंत बाहेर पडला. दरम्यान, इन्स्टाग्रामवरील @rahuljoes या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून, तो वेगाने व्हायरल होत आहे. या घटनेनंतर वन्यप्राण्यांच्या अधिवासातून जाणाऱ्या महामार्गांवर वाहन चालवताना अधिक सतर्क राहण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यासाठी प्रत्येकवेळी नवे टी-20 नेतृत्व; यंदा रणजी संघाबरोबर झटपट क्रिकेटसाठीही अभिनववर विश्वास

NSG Commandos New Uniform: एनएसजी कमांडोंसाठी आता 'ब्रीदेबल' गणवेश, वाढत्या उष्णतेतही हवा खेळती राहणार

Cigarette Price Hike: सिगारेटच्या शौकिनांना मोठा झटका! एका पाकिटामागे 10 रुपयांची वाढ; आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

राजकीय आरक्षण; अनुसूचित जमातींच्या भावनांशी खेळ नको!

Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

SCROLL FOR NEXT