उत्तराखंड: भटक्या कुत्र्यांचा मुद्दा देशभर गाजत आहे. भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्र स्थापन करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर अनेक प्राणीप्रेमी याबाबत आवाज उठवताना दिसतायेत. अशात सोशल मिडियावर एक व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. लहान मुलांना वाचविण्यासाठी जर्मन शेफर्ड कुत्र्याने थेट बाल्कनीतून उडी घेतल्याचा हा व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.
सोशल मिडिया एक्सवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. इशिका नावाच्या युझरने हा व्हिडिओ शेअर केला असून, तो ऋषिकेश, उत्तराखंड येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही लहान मुले अंगणात खेळत असताना एक कुत्रा त्यांचा पाठलाग करायला लागतो, हे पाहताच बाल्कनीत बसलेला जर्मन शेफर्ड कुत्रा खाली उडी घेतो आणि कुत्र्याचा पाठलाग करु लागतो.
व्हिडिओ दिसत असल्याप्रमाणे जर्मन शेफर्डने खाली उडी घेतल्यानंतर लहान मुलांचा पाठलाग करणारा कुत्रा देखील त्याच्यापासून बचावासाठी जोरदार धावू लागतो. दरम्यान, जर्मन शेफर्ड मदतीला धावल्यानंतर मुले सुटकेचा निश्वास सोडतात. जर्मन शेफर्डने केलेल्या कृतीचे सर्वांनी कौतुक केले आहे.जर्मन शेफर्ड खूप हुशार असतात असे मत अनेकांनी या पोस्टवर नोंदवले आहे.
दिल्लीत भटक्या कुत्र्यांचा उपद्रव रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राजधानी आणि परिसरातील भटक्या कुत्र्यांसाठी निवारा केंद्राची व्यवस्था करण्याचे आदेश दिले आहेत. यावरुन सर्व स्तरातून प्राणीप्रेमी मत व्यक्त करताना दिसत आहेत. तसेच, भटक्या कुत्र्यांबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.