Viral Video Dainik Gomantak
देश

Viral Video: दोन बायका अन् सहा मुलांसह पठ्ठ्याचा बाइक प्रवास, सोशल मीडियावर देसी जुगाड व्हायरल; व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

Shocking Viral Video: सोशल मीडियाच्या जगात काही व्हिडिओ असे असतात, जे क्षणार्धात लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि व्हायरलही होतात.

Manish Jadhav

Shocking Viral Video: सोशल मीडियाच्या जगात काही व्हिडिओ असे असतात, जे क्षणार्धात लोकांचे लक्ष वेधून घेतात आणि व्हायरलही होतात. सध्या असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यात एकाच बाइकवर तब्बल नऊ जण बसून प्रवास करत आहेत. बाइकच्या मागे बांधलेल्या एका छोट्या 'ट्रॉली'मध्ये लहान मुलांची फौज बसलेली दिसते, ज्याने सर्वांनाच चकित केले आहे. एका व्यक्तीच्या या 'देसी जुगाड'मुळे लोक हैराण झाले असले, तरी यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

दरम्यान, व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती बाइक चालवत आहे, ज्याच्या मागे दोन महिला बसल्या आहेत. पण खरी गोष्ट बाइकच्या मागे जोडलेल्या छोट्या ट्रॉलीत आहे. या ट्रॉलीत कमीत कमी अर्धा डझन लहान मुले बसलेली दिसत आहेत. म्हणजेच, एकाच बाइकवर जवळपास नऊ लोक बसून प्रवास करत आहेत. हा व्यक्ती मोठ्या आरामात बाइक चालवत असून मागे बसलेल्या मुलांची ट्रॉलीही आरामात पुढे जात आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले तर काही लोकांनी या जुगाडाचे कौतुक केले. एका यूजरने लिहिले, "हे तर इंजिनीअरिंगचा चमत्कार आहे, इतके लोक एका बाइकवर!"

कौतुकासोबतच धोक्याची चिंता

व्हिडिओ पाहणाऱ्या एका वर्गाने जिथे या 'देसी जुगाडा'ची प्रशंसा केली, तिथे दुसऱ्या वर्गाने यातील धोक्यावर बोट ठेवले. एकाच दुचाकीवर नऊ लोकांनी प्रवास करणे हे केवळ धोकादायकच नाही, तर लहान मुलांच्या सुरक्षेसाठीही मोठा धोका आहे. एका यूजरने लिहिले, "मजाक-मजाक में हे धोकादायकही असू शकते." तर दुसऱ्याने लिहिले, "एका बाइकवर इतक्या लोकांनी प्रवास करणे केवळ वाहतूक नियमांचे उल्लंघन नाही, तर मुलांच्या जीवालाही धोका आहे."

हा व्हिडिओ @musphira166492 नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. आता तो मोठ्या प्रमाणावर पाहिला जात आहे. व्हिडिओ पाहून लोकांना हसू आवरता येत नाही, पण सोबतच ते चिंतेतही आहेत.

वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन

भारत सरकारच्या मोटर वाहन कायद्यानुसार (Motor Vehicle Act), दुचाकीवर दोनपेक्षा जास्त लोकांना बसण्याची परवानगी नाही. याशिवाय, लहान मुलांना सुरक्षितपणे नेण्यासाठी योग्य सीट आणि हेल्मेटचा वापर अनिवार्य आहे. या व्हिडिओमध्ये वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे, ज्यामुळे भविष्यात मोठा अपघात होऊ शकतो. थोड्याशा सोयीसाठी इतक्या मोठ्या धोक्याला आमंत्रण देणे योग्य नाही.

हा व्हिडिओ कौतुकाचा विषय असला तरी, तो आपल्या सुरक्षेबाबतच्या निष्काळजीपणाचे प्रतीक आहे. वाहतूक पोलीस आणि प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे, जेणेकरुन भविष्यात असे जीवघेणे अपघात टाळता येतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: 'जिकडे-तिकडे हायवेवर खड्डे, गणराया मी गावी येऊ कसे...'; मुंबई-गोवा महामार्गाचा व्हिडिओ व्हायरल!

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी खूशखबर! मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना घातली बंदी

मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

हे काय घडलं शेवटच्या चेंडूवर? विजयासाठी 1 रनची गरज असताना ट्वीस्ट, हातची मॅच गमावली; Watch Video

2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

SCROLL FOR NEXT