मोडकळीस आलेले घर अन् तुटलेले छत, अखेर मिळाला प्रेमाचा निवारा; 80 वर्षीय निराधर आजीच्या मदतीला धावले प्रशासन

Goa administration helps elderly woman: समती दत्ता गावडे वेळीप या निरंकाल येथील मोडकळीस आलेल्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून राहत होत्या. विधवा असलेल्या समती यांच्या कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत.
Goa administration helps elderly woman
Goa government aid to senior citizensDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: मोडकळीस आलेल्या घरात वास्तव्य करणाऱ्या ८० वर्षीय निराधार आजीच्या मदतीला प्रशासन धावले. सरकारच्या अंत्योदय तत्वाअंतर्गत प्रशासनाने महिलेला प्रेमाचा निवारा मिळवून दिला. शिरोडा येथील निरंकाल येथे मोडकळीस आलेल्या घरात राहणाऱ्या समती दत्ता गावडे वेळीप यांचे प्रेव्हेदोरिया संचलित वृद्धाश्रमात सुरक्षितपणे स्थलांतर करण्यात आले.

समती दत्ता गावडे वेळीप या निरंकाल येथील मोडकळीस आलेल्या घरात गेल्या अनेक दिवसांपासून राहत होत्या. विधवा असलेल्या समती यांच्या कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत. त्यांच्या घराची अवस्था अत्यंत दयनीय झालीय आणि जीवितकार्य चालविण्यासाठी त्यांना अगदीच तुटपुंजा आर्थिक पाठिंबा आहे. या परिस्थितीची माहिती फोंडा उपजिल्हाधिकारी शुभम नाईक यांना मिळाली. प्रशासनाने तात्काळ या घटनेची दखल घेऊन उपाययोजना सुरु केली.

Goa administration helps elderly woman
2027 मध्ये गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळवून देऊ, मंत्रिपदाची शपथ घेताच कामत, तवडकरांची हमी; लोबो दाम्पत्य, गावडे, बाबुशची कार्यक्रमाला दांडी

समती यांनी कोणाकडून मदत घेतली नव्हती. दरम्यान, प्रशासनाने त्यांची भेट घेऊन मदत देण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांनी मोडकळीस आलेले घर सोडण्यास होकार दिला. प्रशसानाने देखील आजीला कोणी जवळचे नातेवाईक नसल्याची खातरजमा केल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: या प्रकरणात लक्ष घालण्याचे ठरवले. शुभम नाईक यांनी प्रेव्हेदोरियाचे संचालक विनायक वळवईकरांना संपर्क साधून आजीच्या परिस्थितीचे कथन केले.

Goa administration helps elderly woman
ओल्ड वाईन इन न्यू बॉटल! प्रमोद सावंतांच्या सरकारमध्ये दिगंबर कामतांची मेजॉरिटी; भाजप कार्यकर्त्यांना सरदेसाई म्हणाले, 'RIP'

यानंतर आजीला वृद्धश्रमात जागा देण्याची विनंती केली. यानंतर आजीची शिरोडा येथे आरोग्य तपासणी करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर आजीचे पोलिस वाहनांच्या सुरक्षेत मोठ्या सन्मानाने २४ तासांच्या आता जुन्या घरातून वृद्धाश्रमात स्थलांतर केले. समाज कल्याण खात्याअंतर्गत आजीला आवश्यक पुढील मदत दिली जाणार आहे. प्रशासनाने दाखवलेल्या जलद कृतीचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com