Navjot Singh Sidhu Viral Post Dainik Gomantak
देश

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Navjot Singh Sidhu Viral Post: ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक ठरली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Sameer Amunekar

ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात टीम इंडियासाठी निराशाजनक ठरली आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. संघाच्या या पराभवानंतर सोशल मीडियावर माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू चर्चेचा विषय ठरले आहेत. एक बनावट पोस्ट व्हायरल होत असून त्यात असा दावा करण्यात आला आहे की सिद्धू यांनी बीसीसीआयला गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांना त्यांच्या पदावरून हटवण्याची मागणी केली आहे.

व्हायरल पोस्टमुळे खळबळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका पोस्टमध्ये सिद्धू यांच्याशी असे विधान जोडण्यात आले आहे की, “जर भारताला २०२७ चा विश्वचषक जिंकायचा असेल तर बीसीसीआयने तात्काळ अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांना हटवावे आणि रोहित शर्माला पूर्ण सन्मानाने कर्णधारपदी पुन्हा बसवावे.”

ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली आणि चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली. मात्र, या दाव्याचा सत्याशी काहीही संबंध नाही.

सिद्धूचा संताप

या बनावट पोस्टमुळे नवज्योत सिंग सिद्धू यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत हे सर्व खोटे असल्याचे स्पष्ट केले.
सिद्धू म्हणाले,

“मी असे कधीच म्हटले नाही. खोट्या बातम्या पसरवू नका. मला कधीच वाटले नव्हते. तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” त्यांच्या या पोस्टनंतर चाहत्यांनीही बनावट माहिती पसरवणाऱ्यांवर टीका केली आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध व्यक्तींविषयी खोट्या पोस्ट किंवा विधानं व्हायरल होणं आता नवीन राहिलेलं नाही. सिद्धू हे या प्रवाहाचे आणखी एक उदाहरण ठरले आहेत. अनेकदा अशा अफवा प्रसारित होतात आणि त्यांचा परिणाम संबंधित व्यक्तींवर होतो.

सिद्धूंचा वाढदिवस आणि कारकीर्द

२० ऑक्टोबर रोजी नवज्योत सिंग सिद्धू यांचा ६२ वा वाढदिवस आहे. ते १९८३ ते १९९९ दरम्यान टीम इंडियासाठी खेळले आणि त्यांच्या काळात भारतीय फलंदाजीचा एक मजबूत कणा होते. नंतर त्यांनी क्रिकेट समालोचन आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले. २००४ मध्ये ते राजकारणात दाखल झाले आणि पंजाबमध्ये त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली.

सध्या सिद्धू क्रिकेटपासून दूर असले तरी, त्यांचे नाव सोशल मीडियावर चर्चेत राहणे हे काही नवीन नाही. बनावट पोस्टच्या या प्रकरणाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की, सोशल मीडियावर माहिती शेअर करण्यापूर्वी तिची सत्यता पडताळणे किती आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

कुडचडे मार्केटमध्ये भीषण आग! भाजीपाला आणि फुलांचे स्टॉल जळून खाक, विक्रेत्यांचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT