Coronavirus Dainik Gomantak
देश

मास्कपासून सुटका नाहीच; देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका: निती आयोग

देशात रुग्णांची वाढती आणि घटती संख्या पाहता येणाऱ्या काळात मास्क (mask) परिधान करणे अजून जास्त जिकरीचे होणार आहे.

दैनिक गोमन्तक

भारतात कोरोनाचा (Coronavirus In India) धोका अद्याप काही कमी झालेला नाही. याच पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के.पॉल (Dr. V. K.Paul) यांनी भाष्य केले आहे. देशात रुग्णांची वाढती आणि घटती संख्या पाहता येणाऱ्या काळात मास्क परिधान करणे अजून जास्त जिकरीचे होणार आहे. त्याचबरोबर येत्या काही काळात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शक्यता नाकारता येत नसल्याचेही यावेळी पॉल यांनी म्हटले आहे. तसेच पॉल पुढे म्हणाले, मास्क घालणे आता बंद होणार नाही. पुढील वर्षापर्यंत सुध्दा कोरोनाचा धोका लक्षात घेता मास्क घालणे आवश्यक बनले आहे. कारण कोरोनाविरुध्दचा लढा आपणाला शिस्त, लस आणि प्रभावी औषधांद्वारेच जिंकला जाऊ शकतो. आणि मला विश्वास आहे की, या कोरोना महामारीवर मात करु शकू.

दरम्यान, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेबद्दल विचारले असता डॉ. पॉल म्हणाले, देशात कोरोनाची तिसरी लाट येणार नसल्याचे नाकारत येणार नाही. येत्या तीन-चार महिने खूपच महत्त्वाचे आहेत. आपल्याला स्वतःच्या संरक्षणांबरोबर कोरोनाचा उद्रेक टाळणे आवश्यक आहे. त्यामुळे आगामी सणासुदीच्या काळात सुरक्षेसंबंधी अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. शासनाने घालून दिलेल्या कोविड प्रोटोकॉलचे पालन अत्यावश्यक बनले आहे. त्यामुळे मास्क घालणे, सॅनिटाझरने हात धुणे, सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे इत्यादींचा समावेश असणार आहे. संसर्गजन्य रोगांचा सामना करण्यासाठी मास्क घालणे सर्वात प्रभावी मार्ग असल्याचे मानले जात आहे. देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मोठी जीवीतहानी झाली. देशात या लाटेच्या दरम्यान दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद होत होती.

लस घेतल्यानंतर अँटीबॉडीज होतात कमी

देशभरात कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाच्या (Coronavirus Vaccination) मोहीमेची सुरुवात केली. देशात 75 कोटी नागरिकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत तरुणांचे पूर्ण लसीकरण पूर्ण होणे आपेक्षित आहे. परंतु दरम्यान एका अभ्यासाने पुन्हा एकदा चिंतेत भर टाकली आहे. ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिन आणि कोविशील्डची लस घेतली आहे, त्यांच्यामध्ये अँटीबॉडीजचा स्तर तीन महिन्यांमध्ये कंमी झाला असल्याचे निदर्शनास आले असल्याचे आयसीएमआरच्या प्रादेशिक वैद्यकिय संशोधन केंद्राला आढळून आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना Good News कधी? 7 महिने उलटले तरी पगारवाढ नाही; सरकारने दिली महत्त्वाची अपडेट

Samuel Braganza Case: सॅम्युअल मृत्यूप्रकरणी गोपनीय अहवाल सादर, प्रकरणाला निर्णायक वळण; दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

Cricketer Suicide: 'माझी संघात निवड झाली नाही...'; सुसाइड नोट लिहून क्रिकेटपटूची आत्महत्या, क्रीडाविश्वात हळहळ

Bhiwandi Building Collapse: 'जीव वाचवण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली'; भिवंडी दुर्घटनेत बचावलेल्यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव VIDEO

SCROLL FOR NEXT