vijay diwas 1971 History of Vijay Diwas 16 December

 

Dainik Gomantak

देश

16 डिसेंबरचा विजय दिवस! पाकिस्तानची भळभळती जखम

1971 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक युद्ध जिंकले होते . आणि हाच तो दिवस म्हणजे याच दिवशी पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली होती

Abhijeet Pote

16 डिसेंबर हा दिवस भारतसाठी (India) तसेच तसेच त्याचे शेजारी देश पाकिस्तान (Pakistan) आणि बांग्लादेशसाठी (Bangladesh) खूप संस्मरणीय मानला जातो. हा दिवस भारत आणि बांग्लादेशला अभिमानाने आपले डोके वर काढण्याची संधी देतो तर दुसरीकडे पाकिस्तानला मात्र आपली मान शरमेने खाली घालायला भाग पडतो कारण 16 डिसेंबर म्हणजे हाच तो दिवस आहे ज्यादिवशी 1971 मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक युद्ध जिंकले होते (vijay diwas 1971) . आणि हाच तो दिवस म्हणजे याच दिवशी पाकिस्तानची फाळणी होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली होती. ज्याला तेव्हा पूर्व पाकिस्तान म्हटले जायचे. भारत हा दिवस पाकिस्तानवर विजय दिवस म्हणून साजरा करतो. 50 वर्षांपूर्वी याच दिवशी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. त्यांच्या सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली. 50 वर्षांपूर्वी याच दिवशी पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. त्यांच्या सैन्याने भारतासमोर शरणागती पत्करली होती. (vijay diwas 1971 History of Vijay Diwas 16 December)

दुसऱ्या महायुद्धानंतर लष्कराचे हे सर्वात मोठे आत्मसमर्पण मानले जाते. जे पाकिस्तानने भारतासमोर केले. केवळ पाकिस्तानच्या घमंडामुळे दोन्ही देशांमधील युद्ध सुरू झाले, पाकिस्तानने भारताच्या 11 एअरबेसवर हल्ला केला. भारताच्या तिन्ही सैन्याने एकत्र लढण्याची ही बहुधा पहिलीच वेळ असावी. पश्चिमेकडील पाकिस्तानी सैन्याच्या कारवाईला भारताने तात्काळ प्रत्युत्तर दिले आणि सुमारे 15,010 किमीचा पाकिस्तानचा भूभाग ताब्यात घेतला.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल अमीर अब्दुल्ला खान नियाझी यांनी 93,000 सैनिकांसह भारतीय लष्कर आणि बांग्लादेशच्या मुक्ती वाहिनीच्या संयुक्त सैन्यापुढे शरणागती पत्करल्यानंतर युद्ध संपले. 16 डिसेंबर 1971 रोजी जनरल ए के नियाझी यांनी ढाका येथे आत्मसमर्पण करारावर स्वाक्षरी केली, ज्यामुळे पूर्व पाकिस्तानमध्ये नवीन राष्ट्र म्हणून बांग्लादेशची निर्मिती झाली. बांगलादेशच्या जन्माबरोबरच पाकिस्ताननेही आपला निम्मा भूभाग गमावला.

हे युद्ध फक्त 13 दिवस चालले

हे युद्ध केवळ 13 दिवस चालले आणि इतिहासातील सर्वात लहान युद्धांपैकी एक मानले जाते. पण त्याचा निकाल आजही पाकिस्तानला पराभवाची आठवण करून देतो. 3 डिसेंबर 1971 ते 16 डिसेंबर 1971 दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी संघर्ष झाला. भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला भाग पाडले त्यांचे 93,000 सैनिक पकडले आणि बांगलादेशातील 75 दशलक्ष लोकांना स्वातंत्र्य मिळवून दिले.पूर्व पाकिस्तानातील बंगाली लोकसंख्येवर पाकिस्तानने केलेला नरसंहार संपवण्यासाठी या युद्धात भारताचे 3000 सैनिक हुतात्मा झाले. यासोबतच पाकिस्तानचे 8000 जवान शहीद झाले. आणि या युद्धानंतर बांगलादेशला स्वातंत्र्य मिळाले.

पाकिस्तानने हिंदू लोकांची हत्या केली

वास्तविक बांगलादेश पूर्वीचा पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान पासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी लढत होता. 1971 मध्ये, पाकिस्तानी सैन्याने निरपराध बंगाली लोकांवर , विशेषत: पूर्व पाकिस्तानमधील अल्पसंख्याक हिंदू लोकसंख्येवर क्रूर कत्तल सुरू केले. पाकिस्तानचे अत्याचार वाढले तेव्हा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला, त्याचवेळी सीमेच्या पलीकडे नागरिकांना आश्रय देखील दिला.त्यांनी लष्करप्रमुख जनरल सॅम माणेकशॉ यांना पाकिस्तानविरुद्ध आक्रमण सुरू करण्याचे आदेश दिले, त्यानंतर भारताने आपल्या शेजारी देशाविरुद्ध संपूर्ण युद्ध सुरू केले.

जागतिक नेत्यांना इंदिराजींचे आवाहन

दरम्यान या संघर्षावेळी इंदिरा गांधींनी जागतिक नेत्यांना हस्तक्षेप करण्याचे आवाहन देखील केले होते आणि पाकिस्तानची क्रूरता थांबवण्यासाठी दबाव आणण्याचे आवाहन केले परंतु भारताकडे जास्त वेळ नव्हता आणि त्वरित कारवाई आवश्यक बनली. 6 डिसेंबर रोजी त्यांनी संसदेत घोषणा केली की भारताने बांगलादेश सरकारला मान्यता दिली आहे. युद्धात भारताचा विजय झाला. 2 ऑगस्ट 1972 रोजी भारत आणि पाकिस्तानने सिमला करारावर स्वाक्षरी केली, ज्या अंतर्गत सर्व 93,000 पाकिस्तानी युद्धकैद्यांची सुटका करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT