Video of PM Modi doing workout goes viral

 

Twitter/@sambitswaraj

देश

पंतप्रधान मोदींचा जिममध्ये वर्कआउट करतानाचा व्हिडिओ होतोय 'व्हायरल'

हा व्हिडीओ पीएम मोदींच्या (PM Modi) मेरठ दौऱ्याचा आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच वायरल होत आहे. ज्यामध्ये ते वर्कआउट (Workout) करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पीएम मोदींच्या (PM Modi) मेरठ दौऱ्याचा आहे. पंतप्रधान मोदींनी येथे मेजर ध्यानचंद क्रीडा विद्यापीठाची पायाभरणी केली. यावेळी पंतप्रधान स्वत:जिमचा आनंद घेताना दिसत आहेत. हे विद्यापीठ मेरठच्या सरधना शहरातील सलवा आणि काली गावाचा समावेश असलेल्या परिसरात सुमारे 700 कोटी रुपये खर्चून उभारले जाणार आहे.

मेरठ येथील क्रीडा संकुलनात पोहोचलेल्या पीएम मोदींनी जिमला भेट दिली आणि स्वत: जिममध्ये व्यायाम करण्यास सुरुवात केली. जिम करण्यासोबतच पंतप्रधानांनी या जिम मशीन्सचा आढाव घेतला. पंतप्रधान मोदींनी येथे फिट इंडियाचे उदाहरण ठेवले. पंतप्रधानांचा हा वर्कआउट व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पीएम मोदींचा व्हिडीओ (Video) ट्विटरवर शेअर करत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी लिहिले कि, सशक्त, समृद्ध आणि निरोगी भारताचा पाया हे आपले प्रसिद्ध पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आहेत." पीएम मोदींच्या या कार्यक्रमाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Aditynath) आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनीही हजेरी लावली. क्रीडा विद्यापीठाचे नाव हॉकीचे दिग्ग्ज मेजर ध्यानचंद यांच्या नावावर आहे, ज्यांनी 1928 , 1932,आणि 1936मध्ये भारताला 3 ऑलिम्पिक सुवर्णपदके मिळवून दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Elon Musk: भारताने एका दिवसात 640 मिलियन मतांची मोजणी केली, पण अमेरिकेत...; एलन मस्क बनले भारतीय वोटिंग सिस्टिमचे दिवाने

Goa BJP: भाजपच्या पणजी मुख्यालयात जल्लोष! फटाक्यांची आतषबाजी; Social Media वर आनंदोत्सव

Shreyas Iyer: गोव्याविरुद्ध श्रेयस अय्यरची झंझावाती खेळी! चौकार, षटकारांची आतिषबाजी; मुंबईचा 26 धावांनी विजय

Pilgao Farmers Protest: शेतकऱ्यांच्या मागण्यासंदर्भात तोडगा काढा! डिचोलीतील ट्रकमालकांची मागणी; आंदोलनाची दिशा ठरणार?

Cash For Job: आणखी एक ठकसेन! विदेशात नोकरी देण्याच्या बहाण्याने अनेकांना लाखो रुपयांना लुबाडले

SCROLL FOR NEXT