देश

Arunachal Pradesh सीमेजवळ चीन करतेय बांधकाम, पोकलॅनचा व्हिडिओ समोर

गोमन्तक डिजिटल टीम

अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) सीमावर्ती भागात चिनी सैन्याच्या (Chinese Army) पुन्हा एकदा हालचाली दिसून आल्या आहेत. चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी (PLA) अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ बांधकाम करत आहे. मोठमोठी मशीन आणून हे बांधकाम केले जात आहे. पोकलॅनचे काम सुरू असतानाचा याबाबत स्थानिक लोकांनी तयार केलेला एक व्हिडिओ समोर आला आहे.

इंडिया टुडेने याबाबत प्रसारित केलेल्या बातमीनुसार, एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यात असा दावा केला आहे की, चिनी सैन्याच्या बांधकामात वापरल्या जाणार्‍या अवजड मशीन अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ काम करताना दिसत आहेत. अरुणाचल प्रदेशातील अंजू जिल्ह्यातील लोकांच्या म्हणण्यानुसार, भारतीय सीमेजवळ असलेल्या चगलगामच्या हदिगरा-डेल्टा 6 भागात पीएलएचे जवान बांधकाम करत आहेत.

बांधकाम संबधित सुरू असलेला या कामाचा हा व्हिडिओ 11 ऑगस्ट 2022 रोजी रेकॉर्ड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक डोंगराळ भागात मशिनद्वारे पर्वत तोडताना दिसत आहेत. अरुणाचल प्रदेशातील एलएसीजवळ राहणाऱ्या लोकांनी चीनच्या या कथित घुसखोरीवर गंभीर चिंता व्यक्त केली आहे. चगलम हे भारत-चीन सीमेजवळ (LAC) भारताचे शेवटचे प्रशासकीय चौकी आहे. चगलमबाबत सूत्रांनी सांगितले की, सामान्य माणसाला येथे पोहोचण्यासाठी सुमारे चार दिवस लागतात.

याबाबत माहिती देताना एका स्थानिक नागरिकाने सांगितले की, भारतीय लष्कर आंतरराष्ट्रीय सीमेजवळ कोणालाही परवानगी देत ​​नाही. मात्र, भारताच्या बाजूने उभारलेल्या पायाभूत सुविधा कमकुवत असल्याचेही त्यांनी नमूद केले. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन येथे अतिशय संथ गतीने काम करत असल्याचे स्थानिक लोकांचे म्हणणे आहे, तर चीनने सीमेपर्यंत पोहोचण्यासाठी 4 लेनचा रस्ता तयार करत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT