Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel Dainik Gomantak
देश

Video: छत्तीसगढच्या मुख्यमंत्र्यांनी गोवर्धन पूजेदरम्यान झेलले चाबकाचे वार

बीरेंद्र ठाकूर (Birendra Thakur) यांना मुख्यमंत्री बघेल यांनी चाबकाचे फटके मारायला सांगितले.

दैनिक गोमन्तक

छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chhattisgarh Chief Minister Bhupesh Baghel) आज पहाटे गोवर्धन पूजेदरम्यान हातावार चाबकाचे फटके खाताना दिसून आले. मुख्यमंत्री बघेल दरवर्षी दुर्ग जिल्ह्यातील (Durg) जंजगिरी गावाला भेट देतात. दरम्यान येथील रहिवासी असलेले बीरेंद्र ठाकूर (Birendra Thakur) यांना मुख्यमंत्री बघेल यांनी चाबकाचे फटके मारायला सांगितले. आपल्या आयुष्यातील अडथळे नष्ट होतात असे त्यांनी बोलताना सांगितले.

आता ही परंपरा बीरेंद्र ठाकूर पाळतायेत

दरम्यान ही प्राचीन परंपरा असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. अशा प्रकारे, सोतेचा प्रहार अडथळ्यांचा नाश करुन आनंद आणि समृद्धी आणणारा आणतो. मुख्यमंत्री बघेल यांनी यावेळी ग्रामस्थांशी बोलताना सांगितले की, दरवर्षी भरोसा ठाकूर धडक देत असत. आता ही परंपरा त्यांचे पुत्र बिरेंद्र ठाकूर पार पाडत आहेत. गोवर्धन पूजा ही गाईच्या समृद्धीची पूजा आहे, गाय जितकी समृद्ध तितकी आपली प्रगती होईल. त्यामुळेच ग्रामीण भागात गोवर्धन पूजा लोकप्रिय आहे. लोक वर्षभर त्याची वाट पाहत असतात. एक प्रकारे ही पूजा गाई वंशाप्रती आपल्या कृतज्ञतेचे प्रतीक आहे.

गोवर्धन पूजन लोकोत्सवाची परंपरा

ते पुढे म्हणाले, 'दरवर्षी मी तुम्हा लोकांसोबत गोवर्धन पूजेसाठी सकाळी लवकर पोहोचतो. गोवर्धन पूजा ही लोकोत्सव परंपरा आहे. आपल्या पूर्वजांनी खूप सुंदर परंपरा निर्माण केल्या आहेत. या परंपरांमधून आपल्या जीवनाला खरा अर्थ मिळतो. आज मी तुमच्याबरोबर असल्यामुळे आनंदी आहे. तसेच एवढा मोठा जनसमुदाय पाहून माझे मनही आनंदाने भरुन आले आहे. गोवर्धन पूजा आणि गौरा गौरी पूजा आपल्या मातीशी घट्ट नाते निर्माण करते. यासोबतच मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, 'तुमचा आनंदाने भरलेला चेहरा पाहून आपले राज्य सांस्कृतिकदृष्ट्या किती समृद्ध आहे याची मी कल्पना करु शकतो. आणि हीच सांस्कृतिक समृद्धी आपण वारसा म्हणून कशी सांभाळत आहोत, याचाही अनुभव येतो. आपल्या मातीची अस्मिता जपणे हे आपले आद्यकर्तव्य आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT