आज म्हणजेच शनिवारी देशाच्या उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक आहे आणि त्याच्या एक दिवस आधी केंद्र सरकारला अनेकदा फोन करणाऱ्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिल्लीत येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. बैठकीदरम्यान ममतांनी राज्यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपयांची आर्थिक मदत केंद्राने द्यावी अशी मागणी केली.
पण मोठी गोष्ट म्हणजे उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधी उमेदवार आणि काँग्रेस नेत्या मार्गारेट अल्वा यांना पाठिंबा देण्यासाठी ममता यांनी शुक्रवारी रात्री उशिरा कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच ममता आणि पंतप्रधान मोदींच्या या भेटीबाबत राजकीय वर्तुळात अशी अटकळ बांधली जात आहे की, ममता यांचा पक्ष तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी आज होणाऱ्या निवडणुकीत भाग घेऊ नये, कारण त्यांनी अल्वा यांना पाठिंबा देण्यासाठी असहमती दर्शवली आहे.
दुसरीकडे, ममतांपुढे आता मोठे राजकीय धर्म संकट उभे ठाकले आहे. जर त्यांनी एनडीएचे उमेदवार जगदीप धनखड यांना पाठिंबा दिला तर त्यांचे आजपर्यंतच्या भाजपविरोधी राजकारणावर प्रश्न उपस्थित केले जातील. त्याचबरोबर बंगाली मतदारही ममतांवर टिका करण्यास मागे पुढे पाहणार नाही.
रायसीना हिल्सच्या कॉरिडॉरमध्ये कोलकाता ते राजधानीपर्यंतच्या मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नाचे उत्तर ममता बॅनर्जींशिवाय कोणीही देऊ शकत नाही. मात्र आता पुतण्या अभिषेक बॅनर्जी आणि नंतर त्यांच्या सरकारमध्ये खंबीर मंत्री असलेले पार्थ चॅटर्जी यांच्या प्रकरणाने ममतांना इतके भाग पाडले आहे की त्यांनी दिल्लीसमोर हात टेकले आहेत. आणि असे करण्याची वेळ का आली असे प्रश्न उपस्थित व्हायला लागले आहे. कोळसा घोटाळ्याच्या एका कथित प्रकरणासंदर्भात ईडीने अभिषेक बॅनर्जी आणि त्यांच्या पत्नीची दीर्घकाळ चौकशी केली, परंतु पार्थ चॅटर्जीसारख्या एका झटक्यात त्यांना अटक करण्याचा कोणताही पुरावा सापडला नाही. मात्र आता दिल्लीच्या गल्लीत 'बंगालची ची शेरणी'चे माप एवढे का बर झुकले अशा चर्चा रंगायला लागल्या आहेत.
ममतांचे त्याच काँग्रेसशी जुने वैर आहे, जिथून त्यांनी राजकारणाला सुरुवात केली आणि बंगालमध्ये आपला ठसा उमटवला. पण जेव्हा मतभेद झाले तेव्हा काँग्रेसपासून फारकत घेऊन नवा पक्ष काढायला ममतांना वेळ लागला नाही. बंगालमध्ये अनेक दशकांपासून राज्य करत असलेल्या डाव्या आघाडीच्या सरकारला उलथून टाकण्यासाठी ममतांनी 13 वर्षे संघर्ष केला असेल, परंतु भारतीय राजकारणासाठी, विशेषत: बंगालच्या सुवर्ण युगाची ती सुरुवात मानली जाते. याच कारणामुळे 1998 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकारमध्ये ममता यांच्या पक्ष टीएमसीलाही भागीदार बनवण्यात आले आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांना देशाच्या पहिल्या रेल्वे मंत्री बनण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
दिल्लीपासून बंगालपर्यंत अनेकांना माहीत आहे की ममता बॅनर्जी लढवय्या राजकीय महिला नेत्या आहेत. रस्त्यावर उतरून आपली ताकद दाखवत ममतांना दाखवली आहे. दूरदर्शन असताना दिल्लीच्या रस्त्यावर अत्यंत रौद्र रूप दाखवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या म्हणून ममतांची ओळख होती. मात्र, शुक्रवारी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेतली. त्याआधी त्यांनी आपल्या पक्षाच्या खासदारांशीही प्रदीर्घ चर्चा केली. पण आज होणाऱ्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत त्यांनी आपल्या खासदारांना काय सांगितले, याबाबचतचे गुढ अद्यापही कायम आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.