Venkateswara Temple stampede Dainik Gomantak
देश

Venkateswara Temple Stampede: आंध्र प्रदेशातील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात चेंगराचेंगरी; नऊ भाविकांचा मृत्यू Video

Andhra Pradesh Venkateswara Temple Stampede: चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Pramod Yadav

आंध्र प्रदेश: श्रीकाकुलम येथील व्यंकटेश्वर स्वामी मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत किमान नऊ भाविकांचा मृत्यू झाला आहे. यात बहुतेक महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे. एकादशीच्या निमित्ताने व्यंकटेश्वर मंदिरात प्रचंड गर्दी झाली असताना ही घटना घडली. घटनेमुळे परिसरात भाविकांंची धावपाळ झाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त करताना घटना "हृदयद्रावक" असल्याचे म्हटले आहे.

मिळालेल्या अधिकच्या माहितीनुसार, सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, चेंगराचेंगरीतील मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. मंदिर परिसरात घडलेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेचा समोर आलेल्या व्हिडिओत भाविक जमिनीवर पडलेले दिसत आहेत. दुसरीकडे जखमींना तातडीने उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खेळ झाला अन् 'काळ' आला! फुटबॉल सामना संपताच अंदाधुंद गोळीबार; 11 जणांचा मृत्यू, मृतांमध्ये लहान मुलांचाही समावेश

Goa News: गोव्यातील ‘कास’ शेती फुलणार! पिळगावचे शेतकरी 4 वर्षांनंतर सरसावले, वायंगणीसाठी तरव्याची लावणी

Zuarinagar: रस्ता दिसतो मात्र, गटारे अतिक्रमणात गायब! आमदार वाझ यांच्याकडून पाहणी; कारवाईसाठी पाठवणार अहवाल

Goa Opinion: शिरगाव चेंगराचेंगरी, हडफडे, चिंबल आंदोलन; प्रत्येक प्रकरणात सरकार बॅकफूटवर जातेय

Abhishek Sharma: 14 चेंडूत 50 धावा, तरी युवराज सिंग अभिषेक शर्मावर नाराज; म्हणाला, "अजून जमले नाही....."

SCROLL FOR NEXT