Venkaiah Naidu Dainik Gomantak
देश

उपराष्ट्रपती नायडू आज अयोध्या दौऱ्यावर; स्वागताची जय्यत तयारी

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रथमच रामनगरी अयोध्येला भेट देत आहेत.

दैनिक गोमन्तक

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आज सकाळी प्रेसिडेंशियल एक्स्प्रेसने अयोध्येला पोहचणार आहेत. अयोध्येतील चार तासांच्या वास्तव्यादरम्यान ते हनुमानगढीला भेट देतील आणि राम मंदिराच्या बांधकामाचे सादरीकरण पाहतील. उपराष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन, राम मंदिर आणि हनुमान गढी येथे भव्य सजावट करण्यात आली आहे. (Venkaiah Naidu to visit Ayodhya today)

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू प्रथमच रामनगरी अयोध्येला भेट देत आहेत. रामललाची पूजा करणारे ते देशाचे पहिले उपराष्ट्रपती असतील. यापूर्वी गतवर्षी 29 ऑगस्टला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) हेही अयोध्येत आले होते.

श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ.अनिल मिश्रा म्हणाले की, संपूर्ण दर्शन मार्गापासून ते गर्भगृहापर्यंत फुलांची सजावट करण्यात येत आहे. दर्शन मार्गावर उपराष्ट्रपतींच्या स्वागतासाठी लाल गालिचा अंथरला जाईल. त्यांना स्मृतिचिन्ह म्हणून राम मंदिराचे मॉडेल देण्यात येणार आहे. रामललाच्या पुजाऱ्यांकडून उपराष्ट्रपतींची विधिवत पूजा केली जाईल.

श्रीमिश्र म्हणाले की, ट्रस्टचे अभियंते आणि कार्य करणाऱ्या संस्थेतर्फे उपराष्ट्रपतींना राम मंदिराच्या बांधकामाची प्रगती तसेच भव्यता आणि अतुलनीय तंत्रज्ञानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली जाईल. दरम्यान, रामजन्मभूमी संकुलाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दर्शन-पूजेनंतर पर्यटन विभागाच्या हॉटेल यात्री निवासमध्ये विसावा घेणार आहे. त्यानंतर ते रेल्वेने (Railway) वाराणसीला रवाना होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT