Vaishno Devi Dainik Gomantak
देश

Vaishno Devi यात्रा आता काही मिनिटांत होणार पूर्ण, सरकारने घेतला 'हा' मोठा निर्णय

Vaishno Devi Temple Distance: जम्मूमध्ये स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात.

Manish Jadhav

Vaishno Devi Ticket: जम्मूमध्ये स्थित माता वैष्णोदेवीचे मंदिर हिंदूंसाठी एक पवित्र स्थान आहे. दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मंदिर उंचीवर असल्याने वृद्ध किंवा अपंग व्यक्तींना खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यासाठी हा प्रवास एकतर खर्चिक किंवा कठीण आहे. याठिकाणी रोप वे बांधण्याची अनेक वर्षांपासून मागणी आहे.

आता सरकारने (Government) 250 कोटी रुपये खर्चून रोपवे बांधण्याचा प्रकल्प सुरु केला आहे. 2022 मध्ये सुमारे 91 लाख भाविक मातेच्या दर्शनासाठी आले होते. यातील बहुतेक लोक त्रिकुटा पर्वतावर असलेल्या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी 12 किमी लांबीच्या ट्रॅकवरुन गेले होते.

दरम्यान, जे भाविक पायी चालू शकत नाही ते पिट्टू किंवा खेचराची मदत घेतात. 12 किमी अंतर पायी कापून परत येण्यासाठी 1 दिवस लागतो. आता रोप वेमुळे भाविकांना दिलासा मिळणार आहे. हा रोपवे 2.4 किलोमीटर लांबीचा असेल, यासाठी RITES म्हणजेच रेल्वे इंडिया टेक्निकल अँड इकॉनॉमिक सर्व्हिसने निविदा मागवल्या आहेत.

तसेच, हा रोप-वे तयार झाल्यावर मंदिरातपर्यंत पोहोचण्यासाठी अवघी 6 मिनिटे लागणार आहेत. आता 5-6 तास लागतात. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 3 वर्षे लागतील. रोपवे कटरा येथील तारकोट बेस कॅम्पपासून मंदिराजवळील सांझी छटपर्यंत जाईल. हा रोप-वे गोंडोला केबल कार प्रणालीने सुसज्ज असेल. याला एरियल रोप-वे असेही म्हणतात.

शिवाय, रोप-वे तयार झाल्यानंतर भाविकांचा वेळ तर वाचेलच, पण खेचर किंवा हेलिकॉप्टरपेक्षा हा पर्याय खूपच स्वस्त असेल. 2018 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी मंदिरापर्यंत जाण्यासाठी एका नवीन मार्गाचे उद्घाटन केले होते. याशिवाय, 2020 मध्ये वंदे भारत एक्स्प्रेसही दिल्ली ते कटरा सुरु करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rama Kankonkar Assault: 'दोषींना सोडणार नाही...' रामा काणकोणकर यांच्यावरील हल्ल्याचा मुख्यमंत्र्यांकडून निषेध; कठोर कारवाईचे दिले निर्देश

पदक आणि नोकरीचे आमिष दाखवून करायचा शोषण... योग गुरु निरंजन मूर्तीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, 8 महिलांनाही बनवले वासनेचे शिकार

'रामा'ही गोव्यात सुरक्षित नाही; राजकीय नेत्यांकडून काणकोणकरांवरील जीवघेण्या हल्ल्याचा निषेध

Ramesh Tawadkar: मंत्रिपद नकोच होते! का झाले रमेश तवडकर मंत्री? चार दिवसांनी दिले स्पष्टीकरण

पायाला धरुन ओढले, कपडे फाडली, पाच जणांनी गुरासारखे धोपटले; काणकोणकरांना केलेल्या मारहाणीचा थरकाप उडवणारा व्हिडिओ समोर

SCROLL FOR NEXT