Uttarakhand Rain: 47 people died in Uttarakhand dew to heavy rain  Twitter @ANI
देश

देवभूमीवर निसर्ग कोपला, मुसळधार पावसामुळे 47 जणांचा दुर्दैवी मृत्यू

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Rain) पावसाचे थैमान सुरूच आहे. मंगळवारी, उत्तराखंडच्या कुमाऊं भागात मुसळधार पावसामुळे आणखी 42 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे

दैनिक गोमन्तक

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand Rain) पावसाचे थैमान सुरूच आहे. मंगळवारी, उत्तराखंडच्या कुमाऊं (Kumaon) भागात मुसळधार पावसामुळे आणखी 42 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे उत्तराखंडात अनेक घरे कोसळली आहेत(Heavy Rain In Uttarakhand). त्यातील बरचसे लोक अजूनही ढिगाऱ्याखालीच अडकले असल्याची माहिती मिळत आहे. यासह, पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृतांची एकूण संख्या आता 47 वर पोहोचली आहे.(47 people died in Uttarakhand dew to heavy rain)

मागच्या अनेक तासांच्याअथक प्रयत्नानंतर काळ रात्री नैनीतालशी संपर्क पूर्ववत झाला आहे ,असे स्थानिक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे . कुमाऊं प्रदेशात आणखी 42 लोकांचा मृत्यू झाल्याने आणि सोमवारी 5 जणांचा मृत्यू झाल्याने आता आपत्तीमुळे मृतांची संख्या 47 वर गेली आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री धमी यांनी पावसामुळे प्रभावित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले असून पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बाधित लोकांशी संवाद देखील साधला आहे . गेल्या दोन दिवसांत राज्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

तर दुसरीकडे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोलून परिस्थितीचा आढावा घेतला आणि सर्व शक्य मदतीचे आश्वासन देखील दिले आहे . मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासोबत कुमाऊं भागातील पाऊसग्रस्त भागाचा दौरा करण्यासाठी आलेले पोलीस महासंचालक अशोक कुमार म्हणाले की, नैनीतालमधील काठगोदाम आणि लालकुआन आणि उधम सिंह नगरमधील रुद्रपूरमध्ये रस्ते, पूल आणि रेल्वे ट्रॅक खराब झाले आहेत. कुमार म्हणाले की खराब झालेले ट्रॅक दुरुस्त करण्यासाठी किमान चार-पाच दिवस लागतील.

त्याचबरोबर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी भारतीय हवाई दलाची तीन हेलिकॉप्टर राज्यात पोहोचली असून मदत आणि बचाव कार्यात मदत करत आहेत. नैनीताल जिल्ह्यात दोन हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत तर तिसरे हेलिकॉप्टर गढवाल प्रदेशातील बचाव कार्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री धनसिंह रावत आणि पोलीस महासंचालक (डीजीपी) अशोक कुमार यांच्यासह पावसामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बाधित क्षेत्रांचे हवाई सर्वेक्षण केले असून मुख्यमंत्र्यांनी राज्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले आहे . त्याचबरोबर अडकलेल्या लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यावर भर दिला जात असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT