Yogi Adityanath dainik Gomantak
देश

Uttar Pradesh:लखनऊमधील लुलू मॉल मध्ये नमाज पठण करणाऱ्या चार जणांना अटक

Yogi Adityanath: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले कडक कारवाईचे आदेश

दैनिक गोमन्तक

राजधानी लखनऊमधील लुलू मॉलमध्ये नमाज पठण करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले आहे. आरोपींची कसून चौकशी पोलीस करत आहेत. अशा घटकांवर कडक कारवाईचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लुलू मॉलमधील घटने विषयी मुख्यमंत्री योगी म्हणाले की, काही लोक विनाकारण वादग्रस्त भाष्य करत आहेत,आणि जनते मध्ये असंतोश निर्माण करत आहेत. लखनऊ प्रशासनाने या प्रकरणावर पूर्ण गांभीर्य दाखवून अशा लोकांवर कडक कारवाई करावी.

नुकताच लुलू मॉलमध्ये नमाज अदा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर शहरातील नव्याने सुरू झालेला हा शॉपिंग मॉल वादात सापडला होता. याला प्रतिसाद म्हणून काही हिंदुत्ववादी संघटनांनी हनुमान चालिसाही वाचल्या. मॉलभोवती सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली असून आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

अराजकतावाद्यांवर ड्रोनद्वारे नजर ठेवली जात आहे

लुलू मॉलच्या सुरक्षेत पीएसी तैनात करण्यात आली असून ड्रोनद्वारे अराजकवाद्यांवर नजर ठेवण्यात आली आहे. पोलिसांकडून अर्धा किलोमीटर बॅरिकेडिंग लावण्यात आले असून, तेथे तपासणी केल्यानंतरच मॉलमध्ये जाण्यास परवानगी दिली जात आहे. त्याचवेळी मॉल प्रशासनाने निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

एडीसीपी दक्षिण राजेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, सैनिकांना साध्या गणवेशात बॉडी वॉर्म कॅमेरे बसवून मॉलमध्ये तैनात करण्यात आले आहे. मॉलच्या सुरक्षा यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. संपूर्ण परिसरावर ड्रोनद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. यादरम्यान कोणावर संशय आल्यास त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.

एसीपी स्वाती चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, मॉलच्या अर्धा किलोमीटर आधी बॅरिकेड्स लावून तपासणी केली जात आहे. पीएसीसह पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या दरम्यान प्रत्येक व्यक्तीला तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral News Fact Check: मुबलक जांभळे म्हणजे 'दुष्काळाची चाहूल'? सोशल मीडियावर मेसेज होतोय व्हायरल, तज्ज्ञांनी दिलं स्पष्टीकरण

Egg Price Hike: 'ब्रॉयलर' अंडी खाऊ लागली भाव; 90 रुपये डझनने विक्री, 5 महिन्यांनंतर दरवाढ; उकाड्याचा परिणाम

Shreyanka Patil: हवेत चित्त्यासारखी झेप अन् चेंडूवर पकड... श्रेयंकाच्या 'सुपरमॅन' कॅचनं सोशल मीडियावर लावली आग Watch Video

Football Ground Inauguration: माडेल येथे महात्मा गांधी फुटबॉल मैदानाचे उद्‍घाटन, आमदार विजय सरदेसाई यांची उपस्थिती

US Iran Peace Deal: "द डील इज कम्प्लीट!" अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक शांतता करार; 19 जून रोजी स्वित्झर्लंडमध्ये होणार अधिकृत स्वाक्षरी

SCROLL FOR NEXT