Piyush Jain

 

Dainik gomantak

देश

पियुष जैनच्या घरातून 64 किलो सोन्यासह 600 लिटर चंदन तेल जप्त

आता पियुष जैन न्यायालयीन कोठडीत असून प्रकरण न्यायालयात आहे. या अवैध कमाईच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अनेक तपास यंत्रणा कसरत करत आहेत.

दैनिक गोमन्तक

उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) व्यापारी पियुष जैन यांच्या कानपूर येथील घरातून 177 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तेव्हापासून अधिक तपास सुरू आहे. यांच्या कन्नौज येथील घरावर छापे टाकताना 194 कोटींची रोकडही मिळाली आहे. या प्रकरणात या व्यावसायिकाकडून सरकारी (Government) आकड्यांमध्ये वार्षिक केवळ 5 कोटींची उलाढाल दाखवण्यात आली असली तरी वसूल केलेली रक्कम शेकडो कोटींची असल्याचा खुलासाही करण्यात आला आहे. आता पियुष जैन न्यायालयीन कोठडीत असून प्रकरण न्यायालयात (Court) आहे. या अवैध कमाईच्या मुळापर्यंत जाण्यासाठी अनेक तपास यंत्रणा कसरत करत आहेत.

पियुष जैनच्या घरात काय काय सापडले?

GST इंटेलिजेंस डायरेक्टरेट जनरल (DGGI) अहमदाबादच्या टीमने गुरुवारी कानपूर येथील निवासस्थानावर छापा टाकला. यानंतर कन्नौज येथील निवासस्थानावर छापे टाकण्यात आले. तपास यंत्रणा गेल्या पाच दिवसांपासून नोट मोजणी यंत्राद्वारे रोख रक्कम मोजण्यात व्यस्त आहेत. घराच्या भिंती, छत, कपाट आणि तळघरातून बंपर रोकड सापडली आहे. कानपूरमधून 177 कोटी रुपये आणि कन्नौजमधून 17 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. यासोबतच 64 किलो सोने, सुमारे 250 किलो चांदी आणि 600 लिटर चंदन तेल जप्त करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT